Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष पदा करीत (शिवसेना उबाठा) गटाचे नंदुभाऊ पढाल यांचीच पसंती

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : नगर परिषद स्थापनेपासूनच भद्रावती शहर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आता नगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या रिंगणात जेव्हढेही उमेदवार दिसत आहेत, ते सर्व शिवसेनेतून घडलेले आहेत. मात्र सर्वांनीच शिवसेनेचा वापर करुन, मोठे होऊन शिवसेना सोडली. नंदूभाऊ पढाल हे एकमेव असे उमेदवार आहेत की जे शिवसेनेशी प्रामाणिक, एकनिष्ठ राहिले. जेव्हा शिवसेनेला (उबाठा) घरघर लागली होती. पक्षात पदाधिकारी, कार्यकर्ता नव्हता, सर्व जण पक्ष सोडून गेले. पण शिवसेनेचे नंदुभाऊ यांनी आपले अविरत कार्य विस टक्के राजकारण व अंशी टक्के समाकारण करीत त्यांनी स्वतःचे शिवसेना कार्यालय व शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवत ठेवुन शिवसेना जिवंत ठेवली. उध्वसाहेब ठाकरे यांचे विचारधारेशी प्रामाणिक राहिलेला माणूस म्हणून नंदुभाऊची जिल्ह्यात ख्याती राहिली आहे. यामुळे आपला माणूस म्हणून भद्रावतीत ओळखल्या जाणाऱ्या नंदुभाऊ पढाल यांनाच भद्रावती करांची ऐकमेव नगराध्यक्ष पदाकरीता योग्य उमेदवार म्हणून भद्रावती  जास्ती पसंती दिसुन येत आहे.

नंदूभाऊ कार्यकर्ता माणूस आहे. सराफा लाइन मधील दारू दुकान विरोधात त्यांनी आवाज उठविला. वडाचे झाड तोडल्या गेले तेव्हा त्यांनी विरोधात भूमिका घेतली. बुद्ध लेणी प्रवेश द्वार जवळ चुकीचे म्युरल लावले तेव्हा त्यांनी विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे काम करण्याची त्यांच्यात जिद्द आहे. गेली १५ वर्षे पालिकेत नगरसेवक राहून, सत्ताधारी घराणेशाही मुळे त्यांनाही फार काही करता आले नाही. झिंगुजी प्रभागाचा भौतिक विकास अजून अपूर्ण आहे. मच्छी मार्केटचा प्रश्न सुटला नाही. सत्ताधारी यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने नंदू भाऊच्या वार्डात कामे झाली नाही. परंतु सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्षाची भूमिका ते एकटे बजावत राहिले, हे सत्य आहे. त्यामुळे त्यांना आणखी एक प्रमुख पदाची संधी द्यावी दिल्यास अपुर्ण कामे पुर्ण करतिल अशी आशा बाळगुन भद्रावती शहरात शिवसेनेचे जुने दिवस आणण्याची त्यांच्यात  शहरात विकासकामे करण्याची ताकद आहे. त्यांच्या जवळ अनुभव आहे. कामे कशी करायची, निधी कसा आणायचा, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे अशा अनुभवी चेहऱ्याला निवडून देणे, शहरवासीयांना नक्कीच फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे नंदूभाऊ सारख्या प्रामाणिक, एकनिष्ठ, सच्च्या कार्यकर्त्याला नगराध्यक्ष बनविणे, ही भद्रावती करांना काळाची  गरज असल्याचे काही सुजाण जाणकार व मदतारांचे चर्चेतुन कल दिसुन येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या