सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. प्रभागनिहाय उमेदवारांचा ताफा रस्त्यावर उतरला असून घर-घर भेटी, भेटी आणि संवाद मोहिमेला वेग आला आहे. वाढत्या प्रचारासह मतदारांमध्येही चर्चा रंगली आहे. यावेळी कोण प्रभागात बाजी मारणार? प्रचारयंत्रणेत यंदा एक वेगळे चित्र दिसत आहे. माता-भगिनी मागे नाहीत; उलट प्रचाराचा भार खांद्यावर घेत त्यांनीच मैदान तापवले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सौभाग्यवती तथा पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे या प्रचारात सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
आशाताई शिंदे यांनी प्रभाग क्र. 5 मध्ये उमेदवार हर्षद भाऊसाहेब काळे व लता संदीप गायकवाड यांच्या प्रचारार्थ घरो- घरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधून कॉर्नर सभा तसेंच महिलांशी संवाद, स्थानिक अडचणी जाऊन घेणे आणि प्रभागातील प्रत्येक कुटूंबाशी नाते मजबूत करण्याचे काम त्या स्वतः करत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला नवी दिशा मिळाली असून महिला मतदारांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
यावेळी माजी नगरसेविका विद्या वाव्हळ, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा संजिवनी पाटील, शहराध्यक्षा संगिता पारे, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी पवार, रुक्साना पठाण, दिपाली गर्जे, पूजा पोळ, निशा पवार, आर्चना बावटकर आदी माता भगिनी व प्रचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या