सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड - जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग नऊ साठी अहोरात्र जनसेवेत असणारे वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविणारे अडीअडचणी मध्ये धावून जाणारे सर्व समावेशक असणारे बिभीषण धनवडे व नासीर चाचू यांच्या पत्नी सय्यद शबाना नासीर हे उमेदवार आहेत. सामाजिक कामाच्या बळावर त्यांचा विजय पक्का आहे आता फक्त मताधिक्य किती याचीच उत्सुकता लागली आहे.
नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी संध्या शहाजी राळेभात व नगरसेवक पदासाठी सय्यद शबाना नासीर व धनवडे बिभीषण श्यामराव हे जनमानसातील उमेदवार आहेत. नेहमीच लोकांच्या मदतीसाठी ते आघाडीवर असतात. सामाजिक सांस्कृतिक कामाबरोबरच गोरगरीब गरजू लाभार्थींना विविध शासकीय योजनेंचा लाभ मिळवून देण्यात अग्रेसर असतात. यामुळे प्रभागातून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
आमदार रोहित पवार यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. भव्य दिव्य रॅलीने प्रचाराचा शुभारंभ मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला यावेळी महिला माता भगिनी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढा मोठा जनसमुदाय पाहता विजय पक्का आहे आता फक्त मताधिक्य किती याचीच उत्सुकता लागली आहे.
बिभीषण धनवडे हे गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. शहरातील शेकडो महिलांना दरवर्षी मोफत मोहटादेवीचे दर्शन घडवून आणतात
याचबरोबर महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन ते करत असतातजगदंबा महीला मंडळासह सर्वाना वर्षभर देवीची सेवा करण्यासाठी मंदिराचे बांधकाम केले आहे. त्यांच्या या सामाजिक सांस्कृतिक कामामुळे त्यांना माणनारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या रॅलीसाठी खुपच मोठी गर्दी होती.
दुसरे उमेदवार नासीर चाचू सतत लोकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अग्रेसर असतात. शहरातील वंचित लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना मिळवून देणे, विविध दाखले, रेशन, असे कामे स्वतः पदरमोड करून लोकांचे करून देतात. यामुळे या निवडणुकीत सर्व सामान्य मतदार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार यात शंका नाही.
सदाफुले वस्तीवर बिभीषण धनवडे यांच्या वतीने जगदंबा देवीचे मंदीर उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच तेही काम पूर्ण होईल असे धनवडे यांनी सांगितले.


0 टिप्पण्या