Ticker

6/recent/ticker-posts

सहज सुचलं तरुणींना प्रोत्साहन देणारा एकमेव गृप -राशी उराडे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : नागपूरच्या समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे व राजूरा येथील जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप हा नवोदित तरुणींना प्रोत्साहन देणारा एकमेव गृप असल्याचे मत चंद्रपूर शहरातील समाजसेविका राशी  यश उराडे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
बुधवारी त्या नवनियुक्त सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांच्या भेटीसाठी शहरात आल्या होत्या त्यावेळी समाजसेविका उराडे ह्या बोलत होत्या.
गृपमध्ये विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ लेखिका, कवयित्री, रांगोळीकार, चित्रकार, मेकअप आर्टिस्ट या शिवाय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेक तरुणी व मधूर व गोड आवाजाच्या गायिका  आहे.
या गृपचे एकंदर अठरा भाग आहे.त्यात मित्र परिवारचे तिन ते चार गृप आहे.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील अनेक सदस्य या सहज सुचलंला जुळल्या गेले आहे.
विशेष म्हणजे सहज सुचलं वरील ब-याच कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत विविध संस्थांकडून त्यांना कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार बहाल झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या