चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक :-भारताचे संविधान अंगीकारण्यात आलेल्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव येथे संविधानाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रस्थावना सादर करून सामूहिक रित्या संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संविधानाचे शपथ वाचन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे स्थानिक प्राचार्य श्री निकुंभ एम.डी. तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या