चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-स्थानिक जकातदार उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडाऱ्याच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ग्राहक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थी जीवनापासून ग्राहक आणि ग्राहकांचे हक्क ही संकल्पना स्पष्ट व्हावी या उद्देशाने ‘विद्यार्थी ग्राहक जागरूक तर भविष्य उज्ज्वल’ या विषयावर पश्चिमक्षेत्र संघटन मंत्री श्री. नितीनजी काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रीना काळे उपस्थित होत्या. याप्रसंगी प्राचार्या रीना काळे यांचा ग्राहक पंचायतीच्या वतीने शेला, स्मृतीचिन्ह आणि श्रीफळ देऊन उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा महिला प्रमुख सौ. दीप्ती कुरोडे यांनी अ. भा. ग्रा. पंचायतच्या कार्याची भूमिका व उद्देश विशद केला. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. विष्णुपंत पंडे, प्रा. प्रेमराज मोहकर, सौ. उषा मोहकर, डॉ. जयश्री सातोकर, श्री.रवींद्र पांडे आणि शाळेतील समस्त शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार श्री. बाळासाहेब मुंडे यांनी केले.


0 टिप्पण्या