Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळ तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व शुभमंगल पुस्तकाचे विमोचन सोहळा संपन्न

                                
 चित्रा न्युज प्रतिनिधी    
भंडारा  :- महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळ भंडाराच्यावतीने आयोजित माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व शुभमंगल पुस्तकाचे विमोचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले बहुउद्देशीय मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. नेपालजी चिचमलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. रवींद्रजी सोनटक्के प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरून उंच भरारी मारावी व आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेकरिता अहोरात्र कष्ट उपसावे  असे सांगितले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ता अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. श्री. राजेंद्रजी महाडोळे यांनी प्रत्येक माणसाने संकुचित विचारसरणीचा त्याग करून समस्त समाजाच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे. तसेच आपल्या न्याय हक्कासाठी लढता यावे यासाठी आपली संघटन शक्ती वाढवावी असे आवाहन केले. सौ. गायत्रीताई इरले, माजी सरपंच सौंदळ, जिल्हा गोंदिया यांनी सावित्रीमाई प्रमाणे प्रत्येक महिलेने शिक्षण घेऊन स्वतःची निर्णयक्षमता वाढवावी आणि आपलं कुटुंब आदर्श करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष श्री. बाबुरावजी बागडे, श्री. शंकर राऊत, श्री. विजय शहारे, अ. भा. माळी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष श्री. श्रीकांत भूसारी यांचा समावेश होता. सामाजिक कार्यकर्ता श्री. निळकंठ राऊत, श्री. आशुतोष वानखेडे यांचा याप्रसंगी शाल- श्रीफळ- पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्षा सौ.योगेश्वरी उमप यांनी केले. संचलन प्रा. मनिषा चिचमलकर यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. जयश्री सातोकर यांनी मानले. नगरसेवक म्हणून निवडणूक लढवलेले उमेदवार श्री. प्रकाश देशकर, श्री. बाबू बागडे, श्री. मनोज बोरकर, श्री. नितीन गायधने यांचा सत्कार करण्यात आला. वधू-वर परिचय मेळाव्याचे संचलन कु. वृंदा गायधने यांनी केले. वधू-वरांनी मंचावर येऊन स्वतःची ओळख आणि अपेक्षा सांगितल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव श्री.अरविंद मंदुरकर, कोषाध्यक्ष श्री. संजय बनकर, श्री. नरेश बेंदेवार, श्री. सोनिराम लांजेवार, श्री. दुर्गाप्रसाद शेंडे, श्री. रामरतन मोहुर्ले, , श्री. रमेश गोटेफोडे, श्री. अनिल डोंगरवार, श्री. किशोर कांबळे, श्री. देवदास अन्नपूर्णे, र्सौ. सुशीला निर्वाण, सौ. मिना कांबळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या