Ticker

6/recent/ticker-posts

ऐतिहासिक व निसर्ग रमणीय किल्ले अंबागढ़ अपूर्ण कामे,सोयी_ सुविधा तत्काळ करणे गरजेचे


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा  :-शत्रूपासून सुरक्षित,अवघड आणि भव्य,दिव्य किल्ले असावे व या भागातील लष्करी महत्त्व ओळखून गोंडराजे बख़्त बुलंद शाह यांनी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सातपुडा फूट_हिल्स च्या उंच शिखरावर,अत्यंत गर्द वनराईत सन १७०० च्या सुमारास अंबागड किल्ला बांधला. दिसण्यास कुण्या ढाण्या वाघा सारखा हा किल्ला,विदर्भाचा पहारेकरी असे किल्ले अभ्यासक ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्थेचे संस्थापक मो सईद शेख यांनी माहिती देताना पुढे म्हणाले _.  
    ५० वर्षांपूर्वी हा किल्ला अत्यंत दुर्लक्षित व अंतिम घटका मोजत होता,किल्ल्याची दुरावस्था बघून त्यांचे जीर्णोध्दार,संरक्षण करिता कसोशीने प्रयत्न करण्यात आले.१५_२० वर्षे शासन दरबारी प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येवून अखेर प्रयत्नांना यश आले व सन २००४ साली यास "राज्य संरक्षित वास्तू" घोषित करून २ कोटी ३३ लाख रुपए मंजूर होवून काम सुरू करण्यात  आले,नंतर इतर कामासाठी सुद्धा निधी मंजूर करून पुरातत्व विभागा कडून काही कोटीची विकास कामे करण्यात आली.अनेक वास्तूंचे कामे अजून ही शेषअसून,प्रयत्न सुरू आहेत.
किल्ल्यावर अनेक दर्शनीय स्थळे जसे_ बाले किल्ला,भव्य पाण्याचे टाके(बारव), राणीचे स्नान करण्याचे टाके, शत्रूंना कडेलोट करण्याकरिता येथे उत्तर दिशेने खूप खोल दरी असून या दिशेने कडेलोट_ दरवाजा आहे.३० फूट उंच भव्य बुरुज,भव्य प्रवेशद्वार,परकोट आज ही दिमाखात उभा आहे.आज ही वैभवाची साक्ष देतात.
जमिनीपासून किल्ला दीड हजार फुटावर आहे.एकूण १० एकरातील हा किल्ला .पूर्वेस बावनथडी कालवा,बंदरझीरा जलाशय,पश्चिमेस गायमुख,पार्वतीचा हिवर(गुहा),उत्तरेस बघेडा जलाशय तर दक्षिणेस टुमदार जुनाअंबागड व रामपूर तलाव असून चार ही बाजूंनी पर्वतीय,हिरवेगार व निसर्गरम्य परिसरामुळे येथील सौंदर्यात भर पडून जाते.पर्यटकांचे आकर्षण वाढत आहे, येथे पर्यटन सोयी,सुविधांचा अभाव आहे.योग्य रस्ते,वीज,विश्राम गृह,उद्यान,बसण्याची जागा,पाण्याची सोय,पार्किंग,शौचालय ई सुविधा निर्माण करण्याची अत्यंत गरजेचे असल्याचेही शेख यांनी पत्रकात नमूद केले आहे.मागील वर्षात शीत अधिवेशन दरम्यान किल्ल्याचे विकास काम करिता शासन तर्फे 50 कोटी रुपये मंजूर करण्याबाबत मा.मुख्यमंत्री यांना पत्र देवून विनंती केली होती.जतन व सौंदर्यीकरण ची विकास कामे झाल्यास हे भविष्यात जिल्ह्यातील नव्हे तर हे विदर्भातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या