Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर समाजप्रबोधनाचे प्रभावी शिल्पकार होते. ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. स्वच्छता, ग्रामस्वराज्य, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि सामाजिक एकता यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेले कार्य आजही तितकेच प्रेरणादायी ठरते. त्यांच्या विचारांनी आणि कृतींनी समाजाला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ एक सग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. स्वच्छता, ग्रामस्वराज्य, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि सामाजिक एकता यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेले कार्य आजही तितकेच प्रेरणादायी ठरते. त्यांच्या विचारांनी आणि कृतींनी समाजाला आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराजांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा .श्री गुरुदेव सेवा मंडळ बोपापुर (ता) यांच्या माध्यमातून साजरा केला जातो. हा सोहळा दिनांक १६ डिसेंबर २०२५ ते १७ डिसेंबर २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे
 " ग्रामसुधारणेचा मुलंमत्र, सज्यनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्राम राज्य निर्माण करी "

दिनांक १६ डिसेंबर २०२५ ला  सर्व ग्रामस्थांच्या उपस्थिती मध्ये महाराजांच्या प्रतिमेची घटस्थापना करुन सामुदायिक प्रार्थना करण्यात आली  .या कार्यक्रमाला  मुख्य अतिथि म्हणुन गुरुदेव प्रचारक संतोष जिवतोडे सर यांनी त्यांच्या चिंतनातून ग्राम रक्षण या विषयावर  मार्गदर्शन केले त्यानंतर 17 डिसेंबरला सकाळच्या ध्यानावर रुपेश पांडुरंग कुत्तरमारे यांनी ध्यानावर चिंतन केले . यानंतर रांगोळी स्पर्धेच आयोजन केले यामध्ये रांगोळी प्रशिक्षक म्हणून जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यशवंत देशमाने, शिक्षक दादाभाऊ मेश्राम सर आणि इंजिनिअर भुषण ढोके , जिवन डंभारे, प्रतिक अरूण हिरादेवे  (पोलीस पाटील) यांनी रांगोळीचे परिक्षण केले यांमध्ये प्रथम क्रमांक सौ,श्वेता काकडे, द्वितीय सौ. संजना हिरादेवे, तृतीय  कु.भावना कुतरमारे, कु देवयानी हिरादेवे, सोनम मेश्राम  यांनी पुरस्कृत करण्यात आले. यानंतर दिंडी सोहळा आयोजित करण्यात आले यामध्ये  खालील मंडळ उपस्थित होते. यामध्ये गुरूदेव महिला भजन मंडळ, बोपापुर (ता), विदेही जगन्नाथ भजन मंडळ चिकणी, गुरूदेव सेवा भजन मंडळ  बोपापुर (ता) , आदिशक्ती महिला भजन मंडळ मसाळा, गोपिका महिला भजन मंडळ जामणी, विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळ चिकणी, गुरूदेव महिला भजन मंडळ जामणी , सतसंग महिला भजन मंडळ,आशी , जगन्नाथ भजन मंडळ चिकणीया दिंडी या सोहळ्याला उपस्थित होते.
दिंडी यावर मार्गदर्शन विजय चिताडे ,चंद्रपूर यांनी केले यानंतर  ह.भ.प.आशिष माणुसमारे  यांच्या साथीला  गुरूदेव सेवा भजन मंडळ डोंगरगाव (रेल्वे) यांनी गोपाळकाला कीर्तन सादर केले यानंतर महाप्रसाद आणि रात्री ह.भ.प. सागर महाराज नांदुरकर,आजनसरा बोपापुर यांनी भारुड सादर केले. अशाप्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ वा पुण्यस्मरण सोहळा पार पडला, या सोहळ्याला गुरूदेव सेवा मंडळ बोपापुर (ता). कायर्यकारणी मंडळ ग्रामसेवा अधिकरी रूपेश पांडुरंग कुतरमारे, उपग्रामसेवाधिकारी  प्रितम अरुण हिरादेवे, सचिव सतिश संभाजी हिरादेवे,प्रचारप्रमुख मोरेश्वर बालाजी कुतरमारे, कोषाध्यक्ष अजित पंढरी हिरादेवे, भजनप्रमुख  प्रलय निमकर हिरादेवे,महिलाप्रमुख सौ सरस्वती नागोजीहरबडे ,सभासद जिवन महादेव डंभारे,सभासद साहिल केशव वासेकर, आजीवन अध्यक्ष विठ्ठल रामचंद्र हिरादेवे ,सभासद आर्यन जनार्दन कौरासे ,सभासद मनोहर विठुजी कुतरमारे,सभासद वैभव विठ्ठल वैदय आणि शिव छत्रपती  क्रीडा मंडळ बोपापुर अध्यक्ष  सतिश संभाजी हिरादेवे आणि  त्यांची टिम समस्त बोपापुर ग्रामवासी  यांच्या  सहकार्यने हा सोहळा  उत्तमरीत्या पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या