Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, यांच्या विरोधात, निलंबित करण्याची मागणी करणार भाजप आमदार कृष्णा खोपडे

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपुर :-राज्यातील आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, यांच्या विरोधात, निलंबित करण्याची मागणी करणार आहे, असे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले आहे. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना, त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची “स्मार्ट सिटी प्रकल्प“चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही, त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपाचा आहे. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत असे म्हणाले आहेत.
 या प्रकरणात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी देण्यात आली आहे, अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल आला आहे, असे भाजपा आमदार खोपडे म्हणाले आहेत. तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला खुले आम धमकी दिली आहे, तर अधिवेशनाला पोहोचताच, बघून घेतो म्हणत फोन कॉल वरून अशी घमकी मिळाली आहे, असे आमदार म्हणाले. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.
  राज्यातील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचे वृत्त झळकताच खोपडे यांना फोनवरून धमकीचे कॉल आल्याची माहिती खोपडे यांनी दिली आहे. तर अधिवेशनासाठी नागपूर येथे असलेल्या खोपडे यांना धमकीचा कॉल आल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. आम्ही तुकाराम मुंढे यांचे समर्थक आहोत, असे सांगून दोघांनी पाहून घेण्याची धमकी देत फोनवरुन इशारा दिला आहे. असे आमदार खोपडे म्हणाले आहेत.
  राज्यातील प्रसिद्ध आणि बदलीमुळे सातत्याने चर्चेत असलेल,े आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात ,भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची “स्मार्ट सिटी प्रकल्प“चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपाचा व भाजपा आमदाराचा आहे. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत.
  नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार कृष्णा खोपडे आज विधिमंडळात प्रवेश करत असताना, त्यांना धमकीचे कॉल आले आहेत. खोपडे यासंदर्भात विधिमंडळ सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला रीतसर माहिती देणार आहेत. त्यानंतर, पोलिस तक्रारही दाखल केली जाईल. तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात लक्षवेधी घटना घडणार असल्याची माहिती आली होती. त्यानंतर, या घटना झाल्याचे समजले आहे. 
  नागपुर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना, त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते. तसेच काही महिला अधिकाऱी व कर्मचारी यांना दमदाटी केली होती. दोन्ही प्रकरणांचे एफआयआर तेव्हा पोलिसांकडे दाखल झाले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात, तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई होऊ शकली नव्हती. आता ते दोन्ही जुने प्रकरण, नव्याने पुन्हा समोर आणून,  भाजप आमदार तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात भाजपा आमदार यांनी धमकी मिळाल्याची माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या