Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास, नातलगाला सरकारी नोकरी मिळणार महाराष्ट्र राज्य वनविभाग


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई:- महाराष्ट्रात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास, संबंधित नातलगाला सरकारी नोकरी मिळणार, आहे ,असे महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र राज्यात मागील कही दिवसांपासून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. राज्यातील आदिवसी व दुर्गम आणि जंगल भागातील परिसरात, बिबट्यांचे नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या हल्ल्यात कोणी आपल्या घरचा कर्ता पुरुष गमावला आहे, तर कोणी लहान मुले, घरातली कमावती माणसे गमावल्याने, अनेकांची आर्थिक परिस्तिथी बिकट होत चालली आहे. राज्यातील काही ठराविक जिल्हयांमध्ये व काही दुर्गम व डोंगर विभागात तालुक्यातील गावागावांमध्ये नागरिक बिबटयाच्या दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. रात्री काळोख पडू लागताच नागरिक दारे, खिडक्या बंद करुन स्वतःला घरातच कोंडून घेऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वन विभागाने महत्वाचा प्रस्तावावर विचार केला आहे.
 राज्यात वाघ अथवा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातलगाला सरकारी नोकरीचे देण्याच्या प्रस्तावावर राज्यातील वनखात्यात गंभीरपणे विचार सुरू आहे. कुटुंबातील कर्ती माणसे गेल्याने आर्थिक वाताहत, मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेती, कर्ज या जबाबदाऱयांची ओझी होतात. त्यामुळे संबंधित कुटुंबावर आलेला आर्थिक भार लक्षात घेता, राज्यातील सरकार लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ शकते, अशी माहिती राज्य सरकारच्या वन विभाग खात्याने दिली आहे.
  राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत व ग्रामीण भागात , डोंगर व दुर्गम आदिवासी भागातही बिबट्या आणि वाघांच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले, तर काही प्रसंगी मानवांवरही हल्ले झाले आहेत. परिणामी राज्यातील काही डोंगर व दुर्गम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिबटयाच्या दहशतीचे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात शासकीय नोकरीसंदर्भातला प्रस्ताव विचारात आहे, तरीही यांसदर्भात लवकरच यासंदर्भात राज्यातील सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता आहे, असे राज्यातील सरकारच्या वनविभागाने म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या