Ticker

6/recent/ticker-posts

हमारा शौचालय,हमारा भविष्य या योजनेचा हाळी-हंडरगुळी परिसरात उडाला फज्जा..!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी:—केंद्रासह राज्य शासनाच्या मार्गदर्शक  सुचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त जि.प.लातुरच्या एस.बी. एम.(स्वच्छ भारत मिशन)ग्रामीण या  विभागाद्वारा हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहिम दि.२१ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पर्यंत राबवा, असे आदेश आर.के.मीना सी.ई.ओ. लातुर यांनी सर्व ग्रामपंचायती तसेच तालुक्याचे अधिकारी यांनी दिले.पण उदगीर तालुक्यातील हाळीहंडरगुळी परिसरातील गावातील निवडक रस्ते व पाणंद रस्ते आदी ठिकाणी हवा खात लोटा घेऊन शेकडो लोटा बहाद्दर बसतात.तसेच हंडरगुळीच्या मारोती मंदीरामागे कुणीही शौचास बसू नये म्हणुन ग्रा.पं.ने कॅमेरा उभा केला.आणि जो कोणी या परिसरात शौचास बसल्याचे कॅमे-या दिसेल त्या लोटाबहाद्दराचा भर चौकात सत्कार करण्यात येईल.असा इषारा ही ग्रा.पं.ने दिला होता.पण एकंदर परिस्थिती पाहता या इषा-याचा व कॅमे-याचा तीळभरही परिणाम दिसत नाही.तरीही ग्रा.पं.लोटाबहादर लोकांचा सत्कार का करत नाही.असे मंदीर परिसरातील जनतेत बोलले जाते.जि.प.सी.ई.ओ.आर.के.मीना यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रा.पंचायती व तालुकास्तरीय अधिकारी यांनी हमारा शौचालय,हमारा भविष्य या मोहिमेची अत्यंत प्रभावी अंमल बजावणी करण्याचे आवाहन केले. शौचालये ही केवळ सोयीचे किंवा शोभेचे साधन नाहि.तर आरोग्य, पत,प्रतिष्ठा व महिलांच्या सुरक्षेची गॅरंटी देणारी मुलभुत गरज आहे.हे त्यांनी स्पष्ट नमुद केले आहे.तसेच या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ज्या गावात सार्वजनिक शौचालये आहेत त्यांची तपासणी,देखभाल,दुरुस्ती व सुशोभिकरण करणे.यावर विशेष लक्ष देण्याचे नियोजन केले आहे.व अर्धवट तसेच नादुरुस्त असलेल्या सार्वजनिक शौचालयांची नोंद घेऊन ते दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले.आणि ही मोहिम सुरु होऊन ९ दिवस झाले.तरीही याचे काटेकोर पालन संबंधित अधिकारीच करत नाहीत.म्हणुनच हाळी,हंडरगुळी सह मोरतळवाडी,सुकनी,आनंदवाडी, रुद्रवाडी परिसरातील गावातील पाणंद रस्ते,राज्यमार्ग तसेच इतरही ठिकाणी लोटाबहाद्दर घाण करत असतात.लोटाबहाद्दरांच्या तावडीतून हाळी बसस्थानक व हंडरगुळीतील मंदीर परिसर हे पण वाचू शकले नाहीत.हे विशेष..! तरीही याकडे ना अधिकारी लक्ष देतात.ना ग्रा.पं.
यामुळे या परिसरात स्वच्छतेचा व हमारा शौचालय,हमारा भविष्य या मोहिमेचा पुरता फज्जा उडालाय. तसेच शौचालयाचे शासकिय बारा हजाराचे अनुदान उचलूनही अनेक कुटूंबे लोटा घेऊम उघड्यावर हवा खात शौचास बसतात.आणि याला संबंधित अधिकारी व ग्रा.पं.कारणी भुत आहेत.तेंव्हा याला कारणीभुत असलेले अधिकारी व ग्रामपंचायती वर लातुर जि.प.चे सी.ई.ओ. राहुल . के.मीना हे कोणती व कधी कारवाई करणार?याकडे या परिसरातील शौचालयाचा नियमीत वापर करणा-यांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या