Ticker

6/recent/ticker-posts

पिपरी पुनर्वसन येथील विहारात महापरिनिर्वाण दिन

       
चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा:-दि. ६ डिसेंबर २०२५ ला बुद्ध विहार समीती पिपरी पुनर्वसन,शहापूर ता. जि. भंडारा च्या वतीने पिपरी पुनर्वसन येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम दलितांच्या मुक्तिलढ्याचे प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन समितीचे कोषाध्यक्ष  किसनजी गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्पांजली वाहून, मेणबत्ती प्रज्वलीत करुन बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन केले. बाबासाहेबांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून यावेळी आदरांजली वाहण्यात आली तसेच सामुहिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली. 
        भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरक कथा मानला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी समानता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या विचारांनी भारतीय लोकशाहीला दृढ पाया मिळवून दिला असून आजही देशभरात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. डॉ. आंबेडकर हे संघर्ष व परिवर्तनाचे प्रतीक आहेत. असे विचार व्यक्त करण्यात आले.
           याप्रसंगी समिती चे सचिव धनराज जी चवरे, वासनिक गुरुजी, मनोजजी चवरे,हिरालाल गजभिये, राजु चवरे, दिक्षित रामटेके,आशिष चवरे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. पंचफुला चवरे, महानंदा गजभिये, निर्मला गजभिये, आशा गजभिये, नीकीता रामटेके,स्वाती चवरे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नानाभाऊ गजभिये यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या