Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव येथे राज्यात प्रथमच शालेय सहलीसाठी शिवाई बस


एस टी महामंडळाचा नवीन उपक्रम...

चित्रा न्युज प्रतिनिधी 
जळगांव  : रा.प‌.महामंडळाने भविष्यात होणारा इंधन तुटवडा पर्यावरणात होणारे प्रदुषण यांचा विचार करत नुकत्याच इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या A/C शिवाई बसेस आपल्या ताफ्यात सामील केलेल्या आहेत. ह्या बसेस आरामदायी असल्याने या बसेस प्रासंगिक करारावर देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असल्याने संपूर्ण राज्यात प्रथमच शालेय सहलीसाठी शिवाई बस देण्याचा मान जळगांव आगाराने पटकाविला. एरंडोल येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल यांना आज छत्रपती संभाजी नगर येथे शालेय सहलीसाठी ४ बसेस फुलांचे हार , फुगे लावून  सजवून रवाना करण्यात आल्या या प्रसंगी जळगांव विभाग नियंत्रक श्री.दिलीप बंजारा , आगार व्यवस्थापक श्री.संदीप पाटील , स्थानक प्रमुख श्री.राजेश देशपांडे यांचेसह ऑलेक्ट्रा कंपनीचे अधिकारी सुनील देवरे, कमलेश पाटील आदी. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या