Ticker

6/recent/ticker-posts

उप लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचेकडून स्व. श्री. लक्ष्मणजी मोटघरे चारीटेबल ट्रस्ट द्वारा संचालिन संपूर्ण महाविद्यालयाची शासन मान्यता रद्द करण्याचे अप्पर मुख्य सचिव व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आदेश.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा/कोंढा कोसरा :-  स्व. श्री. लक्ष्मणजी मोटघरे चारीटेबल ट्रस्ट नागपुर व स्व. श्री. ज्ञानेश्वरजी मॅघरे बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर या दोन्ही ही संस्थेचे अध्यक्ष अरुण एल, मोटघरे सचिव सुजाता अरुण मोटबरे हे. आहेत. या दोन्ही हि संस्थेद्वारा गडचिरोली भंडारा जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमाचे महाविद्यालय चालविल्या जात आहेत. या दोन्ही हि संस्थेद्वारा भंडारा जिल्ह्यात कोंडा कोसरा व लाखांदूर येथे विविध अभ्यासक्रम चालविल्या जात आहेत. डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय काँडा - कोसरा येथे वी.ए. या अभ्यासक्रमाचे अनुदानित महाविद्यालय आहे. वी.एस.सी., बी.कॉम, एम.कॉम, एम.एस.सी. व एम.बी.ए. इत्यादी कायम विना अनुदानित तत्वावर हे एकाच ईमारतीत चालविल्या जात आहेत. तसेच दुसऱ्या ईमारतीत एम.बी.ए., बी.एड., पॉलीटेक्निक, वेटरनरी, बी.एस.डब्ल्यू व एम.एस.डब्ल्यू तसेच ए.एन.एम. (नर्सिंग), ITI, इत्यादी अभ्यासक्रम दुसऱ्या एकाच ईमारतीत चालविल्या जात आहेत. व तिसऱ्या ईमारतीत डी. फार्म. व बी. फार्म. हे अभ्यासक्रम चालविल्या जात आहेत. वरील फक्त बी.ए. च्या अभ्यासक्रमाला मान्यताप्राप्त प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. वाकी संपूर्ण अभ्यासक्रमाला मान्यताप्राप्त प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत नाहीत. हे संपूर्ण कायम विना अनुदानित अभ्यासक्रम शासनाकडून मिळत असलेले शिक्षन शुल्क, इतर शुल्क व डेवलपमेंट फी लाटण्याच्या उद्देशाने खूप मोठी फी विद्यार्थ्यांकडून वसूल करून झीरो अटेंडन्सवर प्रवेश देऊन बोगस डिग्री दिली जात आहे. तसेच वरील संस्थेद्वारा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलिनत कुरखेडा, कोरेगाव, विहीरगाव व देसाईगंज बडसा येथे कायम विना अनुदानित अभ्यासक्रम चालविल्या जात आहेत, या संपूर्ण कॉलेज मध्ये प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत नसतांना बोगस डिग्री दिल्या जात आहेत.
भाऊराव गंगाराम पंचवटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उप लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयाकडून अध्यक्ष, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर, सदस्य, सहसंचालक, व्यवसाय

शिक्षण विभागीय कार्यालय नागपूर सदस्य जिल्हा उप आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय नागपूर, सदस्य सचिव सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर विभाग यांचे प्रतिनिधी इत्यादी अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली या चौकशी समितीने दिनांक ०९/०९/२०२५ रोजी सखोल तपासणी करून स्वयंमस्पष्ठ अहवाल उप लोक आयुक्त यांचे कार्यालयाकडे सादर केलेला आहे. या अहवालावरून वरील संस्थेद्वारा संपूर्ण महाविद्यालयाकरिता सर्वोच्च शिखर परिषदांना एकच खसरा नंबर चा वापर करून तीच जागा परत परत विविध महाविद्यालयासाठी उपयोगात आणलेली आहे. शासनाच्या शिखर परिषदांच्या मानकाप्रमाणे जागेची असलेली गरज पॉलीटेक्निक साठी ४ एकर, वेटरनरी साठी १० एकर, बी.ए., बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी साठी ३ एकर, फार्मसी साठी २.५ एकर, आय.टी.आय. साठी १.०७ एकर, नर्सिंग (ए.एन.एम.) साठी १ एकर, बी.एड. साठी ३ एकर अशी जवळपास २१.५७ एकर ची जागेची गरज आहे परंतु चौकशी मध्ये मिळालेल्या माहिती नुसार कागदपत्रावरून ८.७३ एकर जागा संस्थेची व ५.४८ एकर जागा लीजवर अशी एकूण जागा १४.२१ एकरच आहे. संस्थेकडे जागेची
शासनाच्या निकषाप्रमाणे महाविद्यालय निहाय विभागणी झाली नाही. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार स्व. श्री.
लक्ष्मणजी मोटघरे चारीटेबल ट्रस्ट द्वारा संचालित संपूर्ण महाविद्यालये वर्ग खोल्या / प्रयोगशाळा साठी स्वतंत्र इमारतीची पूर्तता करीत नसल्याने व नियमाप्रमाणे लागणारी जागा आणि मान्यत्येसाठी लागणाऱ्या आवश्यक सोयी सुविधांची पूर्तता करत नसल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शासन मान्यता व सल्नीकरण रद्द करण्याबाबत उप लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई तसेच मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे कडे कार्यवाहीसाठी पाठवलेले आहे. त्यामुळे एका प्रशिद्धी पत्रकात तक्रारकर्ते भाऊराव गंगाराम पंचवटे यांनी या संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये विद्यार्थ्यांचे कधीही भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता वरील संस्थेच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नये असे आव्हान केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या