Ticker

6/recent/ticker-posts

हाळी-हंडरगुळी जवळील पुलांची पडझडसा.बां.खाते थंड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :—उदगीर ते अहमदपुर रोडवरच्या हळी हंडरगुळी गावाजवळील निजाम कालीन चुनखडी व दगडाने बांधलेले पुलांची पडझड होऊन धोकादायक बनले असल्याचे सामान्य जनतेला व वाहनधारकांना दिसते.पण सा.बां. विभाग उदगीरच्या अधिका-यांना दिसत नसल्याने ते थंड असतील ! तसेच एखादी मोठी दुर्देवी घटना घडल्यावरच त्या अधिका-यांच्या अंगातली थंडी जाईल ! अशी चर्चा सुज्ञ नागरीक व वाहनधारक करतात  उदगीर-अहमदपुर हा नांदेड-बिदर कडे जाणारा मार्ग असल्याने अंतर राज्य महामार्ग या नावानेही ओळख आहे.म्हणुन या रोडवरुमन दररोज जड,अवजड अशी हजारो वाहने ये- जा करतात.व याच मार्गावर हाळी व हंडरगुळी गावाजवळ तिरु नदी पुला वरील १ पुल तसेच गुरप्पा नामक १ आणि भटाच्या ओढ्यावरील १ असे ३ पुलं आजघडीला धोकादायक अन् पडण्याच्या अवस्थेत दिसतात.गुरप्पा नामक पुलाचे लोखंडी कठडे गायब तसेच या तीनही पुलांच्या बांधकामा ला मोठमोठे भगदाड पडल्याचे स्पष्ट दिसते.आणि याची माहिती असूनही अधिकारी थंडच असल्याने अपघात व्हावा आणि दुरुस्ती करावी.अशी इच्छा सा.बां.खात्याची नाही ना?दुरुस्तीचा निधी व शासनाने नेमलेली समिती कुठे गायब झाले?असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
याच रोडवर अनेक पुलांची रुंदी करण्याचे काम चालू आहे.तेंव्हा हाळी जवळील दुरावस्था झालेल्या पुलांच्या पाहणीसाठी सहकारी बांधवांना पाठवून माहिती घेणार नी मग वरिष्ठांना अहवाल पाठविणार.. अशी माहिती अलका डाके जे.ई. पीडब्लूडी,उदगीर यांनी दिली.

शासन रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी वार्षीक करोडो रुपये खर्च करते.पण हाळी गावाजवळ असलेल्या निजाम राजवटीतील पुलांची झालेली खराब अवस्था बघता हा निधी गेला कुठे? भगदाड पडलेले व झाडी,झुडपांनी वेढलेले पुलांची दुरुस्ती एखादा मोठा अपघात झाल्यावरच करणार का? असे सवाल फारुख शेख,माजी अध्यक्ष,शिक्षण समिती,हाळी यांनी उपस्थित केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या