अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्यांची अद्याप शासनाने पूर्तता केली नाही - प्रा.रमेशचंद्र दहिवडे
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : शासन दरबारी खितपत पडलेल्या मागण्यांची राज्य शासनाने अद्याप दखल न घेतल्यामुळे येत्या १३तारखेला अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने नागपूर विधानसभेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे (चद्रपूर -गडचिरोली) जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशचंद्र दहिवडे यांनी चंद्रपूर मुक्कामी दिली.
त्यांनी या वेळी सांगितले कि या बाबतीतील मागण्यांचे एक निवेदन बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
अश्या आहे मागण्या -
----------------------------
प्रोत्साहन भत्ता न देता मानधनात दोन हजार वाढ करण्यात यावी.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी देण्यात यावी.
२५ जानेवारी २०२३ला दिलेल्या लेखी आश्वासनानुसार अंगणवाडी महिलांना मानधनाच्या निम्मे पेंशन देण्यात यावी. थकीत २३ महिण्यांचा कोरोना भत्ता देण्यात यावा
आदिं मागण्यांचा निवेदनात समावेश असून शासनाने या मागण्यांकडे अद्याप लक्ष पुरविले नाही.व या मागण्यांची आज पर्यंत दखल देखील घेतली नसल्याचा स्पष्ट आरोप प्रा.रमेशचंद्र दहिवडे यांनी केला आहे.


0 टिप्पण्या