चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : सहज सुचलं हे आचार विचारांचे  एक व्यासपीठ असून या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरू असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूरच्या जेष्ठ समाजसेविका मायाताई कोसरे यांनी आज बोलताना दिली.
 
गत दहा वर्षांपासून मी व राजूराच्या प्रख्यात साहित्यिक ॲड.मेघा धोटे ह्या सहज सुचलंची मुख्य मार्गदर्शिका म्हणून धूरा यशस्वीपणे सांभाळीत आहेत. याच कालावधीत आम्हाला बरेच कडूगोड अनुभव आले.त्याची किंचितही पर्वा न करता मोठ्या हिंमीतीने आम्ही दोघींनी  अल्पकालावधीत सर्व सदस्यांचा विश्वास व प्रेम संपादन करून हे व्यासपीठ निरंतर सुरू ठेवले.
मी सध्या परदेशात असली तरी सहज सुचलं साठी माझे भविष्यात मोठे स्वप्न आहे.या व्यासपीठावरील प्रत्येक महिला व तरुणीं गुणी व कर्तृत्ववान असल्याचा मायाताई कोसरे यांनी आपल्या बोलण्यातून पुनरुच्चार केला.
    प्रत्येकवेळी नवोदितांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन व सुचना करत असल्याचे त्यांनी आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले.
रंज्जू मोडक यांचे परत एकदा गुणगान ! 
सलग चार वर्षे सहज सुचलंची संयोजिका म्हणून जबाबदारी सांभाळणा-या चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक हिची मायाताई कोसरे यांची तोंडभरून स्तुती व कौतुक केले.
यदाकदाचित माझा निरोप कोणाच्या माध्यमातून तिच्या पर्यंत पोहचला तर ती न चुकता मला फोन करून संवाद साधते . 
आगामी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात मी तिची अवश्य भेट घेणार असल्याचे मायाताई कोसरे म्हणाल्या! 
 यांच्या निवासस्थानी बैठकिचे आयोजन ! 
चंद्रपूरात  होणारी पुढील बैठक ही रंज्जू मोडक यांच्या निवासस्थानी घेण्यात यावी अशी सूचना देखील मायाताई कोसरे यांनी केली आहे.