लातूर येथील शाळेची व खेळाडू पालकांची क्रिडा विभागाकडे तक्रार.
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा 14वर्ष वयोगट मुले या स्पर्धा दिनांक 29ऑक्टोबर 2025रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या विभागीय पातळीवरील अंतिम सामना धाराशिव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व समर्थ माध्यमिक विद्यालय एकूर्का रोड तालुका उदगीर जिल्हा लातूर या संघात खेळविला गेला. या वेळी धाराशिव येथील संघातील दोन खेळाडू ची वयोगट चाचणी ची मागणी समर्थ माध्यमिक विद्यालय एकूर्का रोड या शाळेने धाराशिव येथील जिल्हा क्रिडा अधिकारी यांचेकडे केली आहे. व परस्पर विरोधी संघाने ही अशीच मागणी केली होती त्या अनुषंगाने समर्थ माध्यमिक विद्यालय एकूर्का रोड येथील शाळेने धाराशिव येथील जिल्हा क्रिडा अधिकारी यांचेकडे सर्व मागणीनुसार जन्माचे प्रमाण पत्र, वयोगट चाचणी ची प्रमाण पत्रे, आधार कार्ड, प्रवेश निर्गम असे प्रमाण पत्रे जमा केली आहेत.
धाराशिव येथील दोन खेळाडूंची वयोगट चाचणी ची मागणी लातूर येथील खेळाडू पालकांनी लातूर विभागीय क्रिडा उप संचालक महादेव कसगावडे, यांचेकडे दिनांक 30ऑक्टोबर 2025रोजी केली आहे.
तेव्हा स्वतः कसगावडे सरांनी धाराशिव येथील दोन खेळाडूंची जन्मतारखेची चौकशी केली असता एका खेळाडूचे वय 10वर्ष असल्याचे आढळून आले. हे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. या खेळाडूने 10वर्ष वय असल्याचे ग्राम पंचायत ने दिलेले जन्म प्रमाणपत्र जोडले आहे.10वर्ष वय असलेले शाळेचे प्रवेश निर्गम प्रमाणपत्र जोडले आहे असे ही स्पष्ट झाले आहे.
हा सर्व प्रकार रेकॉर्डची माहिती धाराशिव येथील जिल्हा क्रिडा अधिकारी व क्रिडा उप संचालक विभागीय कार्यालय लातूर यांना माहिती असून ही आजपर्यंत लातूर येथील संघास निर्णय मिळाला नाही.
सध्या शासनाने राज्यस्तरीय खेळाडूंना नौकरी मध्ये पाच टक्के आरक्षण दिले असल्याने या साठी चतुर पालक व श्रीमंत पालक रात्रीतून कागदी मेळ बसवीत जन्माच्या तारखा, प्रवेश निर्गम, वरील जन्म तारीख, आधार कार्ड वरील माहिती, किंवा इतर तहसीलदारांचे, शिक्षण अधिकारी यांनी जन्मतारखेत बदल केलेले प्रमाणपत्र प्राप्त करुन जास्त वय असलेले खेळाडू कमी वय करुन खेळून एक प्रकारे गोरगरीब, खेळाडूंच्या भवितव्याशी खेळत आहेत. जाणीव पूर्वक,नियोजनपूर्वक, खोट्या जन्मतारखा चे प्रमाणपत्र जोडून कमी वय करुन खेळून कष्ट करणाऱ्या ओरिजनल खेळाडूवर अन्याय करीत आहेत. त्या साठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तरी हा प्रकार थांबविला पाहिजे व पात्र असणारे च, खेळाडू पुढे गेले पाहिजे. अन्यथा खेळाडू न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.


0 टिप्पण्या