चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-जमात_ए _इस्लाम हिन्द चे अध्यक्ष सैय्यद सआदतुल्ला हुसैनी यांनी "आदर्श शेजार,आदर्श समाज"या ब्रीदवाक्याखाली शेजाऱ्यांच्या हक्कांसाठी नुकतीच १० दिवसीय मोहीम सुरू करण्याची घोषणा करीत ही मोहीम देशभरात राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेचे उद्देश शेजाऱ्यांशी चांगली वागणूक ,सद्भावना पुन्हा जागृत करणे आणि सामाजिक संबंध बळकट करणे आहे.
इस्लाम मध्ये शेजाऱ्यांच्या हक्कांवर खूप भर देण्यात आले असून त्यामुळे ते एका सुसंवादी समाजाचा आधारस्तंभ बनतात .कुराणमध्ये स्पष्टपणे आज्ञा दिली आहे की "सोबत असणारे सोबती यांच्याशी ही दयाळूपणे वागा".या मध्ये कार्यालयातील सहकारी ,सहप्रवासी व पायी चालणारे सहकारी यांचां ही समावेश होतो. या मोहिमेच्या माध्यमातून "मुस्लिमांना या महत्त्वाच्या शिकवणुकीची आठवण करून त्यांना आदर्श शेजारी बनण्यासाठी प्रेरित करू" जेणेकरून समाजा समोर इस्लामचे खरे रूप मांडता येईल.
चांगल्या शेजारधर्माच्या पायावर उभारलेला समाज नैसर्गिकरीत्या एक आदर्श समाज बनतो.जेव्हा शेजारी एकमेकांशी दयाळूपणे क्षमाशिलतेने व न्यायाने वागतात,तेव्हा त्यांचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समुदायामध्ये परिवर्तन घडवून आणतो.
या मोहिमेत महिला व तरुणांसाठी विशेष मार्गदर्शन, सामूहिक स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे. आंतरधर्मीय सलोखा बळकट करून इस्लाम बद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी बिगर मुस्लिम बांधव व भगिनीशी सम्पर्क साधण्यावर विशेष भर दिला जाईल अश्या प्रकारच्या पत्रकाचे वाचन नुकतेच मुस्लिम लायब्ररी चौक जमात _ए _इस्लामीचे जिल्हा कार्यालयात आयोजित सभेत नागपूर_भंडारा जिल्हा प्रमुख जनाब मजहर इमाम व इतर पदाधिकाऱ्यांनी करून मोहीमे बद्दल माहिती दिली. या प्रसंगी मजहर इमाम,इरफान कुरैशी, सैयद मकसूद अली, लतीफ भाई, नजीर कुरैशी, छोटे भाई, इरफ़ात खान,मुशीर अहमद,मुजाहिद चौहान,सोहेल इकबाल(कतर),शकील सिद्दीकी, शाहिद मिर्ज़ा तथा इतर पदाधिकारी ,सदस्य व महिला ई ची उपस्थिति होती।


0 टिप्पण्या