चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- दि. ६ डिसेंबर २०२५ ला मोतीस्मृती ज्ञानजागृत बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा) ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम संस्था सचिव हिरालाल गजभिये यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर उपस्थित कर्मचारी वर्गांनी व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
शिक्षण माणसाला जगण्याचे, लढण्याचे सामर्थ्य देते, शिक्षण माणसाला विचार करायला शिकवते म्हणूनच बाबासाहेबांनी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्या या अमूल्य योगदानाचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी संस्था सचिव हिरालाल गजभिये, शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, सुनिल नागदिवे, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, प्रा. नानाजी गजभिये, निर्मला रंगारी, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये सह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनदयाल दमाहे यांनी केले.


0 टिप्पण्या