चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-दि. ६ डिसेंबर २०२५ ला लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर, ता. जि. भंडारा च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम दलितांच्या मुक्तिलढ्याचे प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष योगेश मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्पांजली वाहून, मेणबत्ती प्रज्वलीत करुन बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन केले. बाबासाहेबांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून यावेळी आदरांजली वाहण्यात आली तसेच सामुहिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरक कथा मानला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी समानता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष हक्कांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या विचारांनी भारतीय लोकशाहीला दृढ पाया मिळवून दिला असून आजही देशभरात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. डॉ. आंबेडकर हे संघर्ष व परिवर्तनाचे प्रतीक आहेत. असे विचार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम, मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.), प्रा. डॉ. राहूल भोरे, आर. एम. पटेल कॉलेज भंडारा, प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे, एन. जे. पटेल कॉलेज मोहाडी, प्रा. डॉ. विजय गणविर, आर्ट अँड कामर्स कॉलेज पेट्रोलपंप (ठाणा), यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. देवेंद्र धारगावे, दिपाली भोरे, वर्षा गणविर, अंश बोरकर, रुपलता गणविर, अश्विनी भैसारे, रूतूजा गणविर, क्षितिजा गोस्वामी, निसर्गा गोस्वामी सह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहूल भोरे यांनी केले.


0 टिप्पण्या