Ticker

6/recent/ticker-posts

साकोली आगार आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली- सध्या साकोली आगार ( एस.टी. डेपो ) सगळ्याच बाबतीत चमकदार कामगिरी बजावीत असून आता आर्थिक उत्पन्नातही आपला डंका वाजवलेला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात साकोली आगार जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर ठरला असून विभाग स्तरावर देखील अव्वल ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक जुने आगार म्हणून या आगाराचे नाव घेतले जाते. तेव्हापासून या आगाराचे अस्तित्व, चित्र पालटत आलेले आहे. साकोली राष्ट्रीय महामार्गावर जसा जसा बदल होत गेला तस तसा कालपरत्वे साकोली आगाराचा चेहरा मोहरा देखील बदलत गेला. गत वर्षी साकोली आगारात स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा मानांकन मिळालेले होते. दरवेळेस सदर आगार आपल्या उत्तम कामगिरीने पुरस्कारापर्यंत पोहोचत असतो. यावेळी सन २०२५-२६  या आर्थिक वर्षात साकोली आगाराने १०९ कोटी १ लक्ष ६४ हजार रुपयाचा नफा कमावून भंडारा जिल्ह्यातील सर्व आगारांना मागे टाकलेले आहे. इतकेच नव्हे तर नागपूर विभागातही अव्वल ठरले आहे. प्रती कि. मी. उत्पन्नाचा विचार केला तर साकोली आगाराने ३३.५९ या दराने सर्वोत्तम कमालीची कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साकोली आगाराने उल्लेखनीय कामगिरी बजवल्याने साकोली तालुक्याचे नाव देखील उंचावले गेले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या विविध सवलत योजनेमुळे एसटीच्या प्रवासी सवलतीत वाढ झाल्याची माहिती आहे. ज्यात महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक, अहिल्याबाई योजना, ज्येष्ठ नागरिक आणि मानव विकास योजना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सदर आगाराकडून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसह सामाजिक उपक्रमात देखील या आगाराचा नियमित सहभाग राहिलेला आहे. या आगाराने उत्तम कामगिरी केल्याने आगार प्रमुख सचिन आगरकर आणि त्यांची चमू यांचे माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, साकोली नगराध्यक्ष देवश्री कापगते, नगरसेवक स्मिता श्रीधर सिडाम, संदीप बावनकुळे, विवेक ( सोनू ) बैरागी, निर्मला कुलदीप नंदेश्वर  शिंदे गटाचे सचिन घोनमोडे, माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज, रवि परशुरामकर  तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर इतर साकोलीचे सदस्य मनिषा काशीवार, ताराचंद कापगते, आशिष चेडगे, सुनील जगिया, ऋग्वेद येवले, शाहीद कुरेशी, संपूर्ण व्हाईस ऑफ मीडिया भंडारा जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आलेले आहे.
-----------------------------------------------
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संपूर्ण  कर्मचारी परिश्रम घेतात. प्रवाशांना जेवढ्या सुविधा देणे शक्य आहे तेवढे आम्ही प्रयत्नशील राहू. विशेष म्हणजे प्रवाशांचे आभार मानले गेले पाहिजेत कारण त्यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. प्रवाशांना आमच्या आगाराकडून कुठलीही सवलत योजनेची माहिती पाहिजे असल्यास आमचा विभाग ती देण्यास तयार आहे. पुन्हा प्रवाशांचे आभार.
सचिन आगरकर.
साकोली आगर प्रमुख.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या