Ticker

6/recent/ticker-posts

संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या शोभायात्रेने भद्रावती नगरी दुमदुमलि


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : येथील शहरातील कुंभार समाजाच्या वतीने संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 709 व्या पुण्यतिथी सोहळा कुंभारपुरा गोरोबा काका देवस्थान आंबेडकर वॉर्ड भद्रावती येथे भावपूर्ण वातावरणात दोन दिवसीय साजरा करण्यात आला 
संत शिरोमणी गोरोबा हे वारकरी संप्रदायातील महान संत असून त्यांचे नाव गोरोबा काका- गोरा कुंभार असे होते त्यांचा जन्म इ स 1267 आहे व त्यांचा मृत्यू इ स 1317 असा आहे ते भक्ती, साधेपणा आणि कष्टाचे प्रतीक मानले जातात भांडी बनविण्याचा व्यवसाय करत असतांनाच त्यांनी विठ्ठल भक्तीत स्वतः ला अर्पण केले 
त्यांचा भव्य पालखी सोहळा शोभा यात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणुन राजू 
गैनवार माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते  , फयाज शेख नगरसेवक  ,  अॅड प्रमोद गेडाम माजी नगरसेवक  , झनक चौधरी कार्यक्रमाचे संयोजक यांची उपस्थिती होती 
पहिल्या दिवशी सकाळी 6 ते 7 वा ग्रामसफाइ - वॉर्डातील प्रमुख मार्गाने, सकाळी 7 ते 9 वा घट स्थापना व मूर्तीचे अभिषेक, सकाळी 10 वा महाआरती , सकाळी 11 वा प्रमुख अतिथी व सत्कार समारंभ या मध्ये शंकर वाणी यांच्या कुंभश्री संत महिमा- चरित्र व अभंगवाणी या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा करण्यात आले दुपारी  2 वा भजनावलि सादरकर्ते महालक्ष्मी भजन मंडळ भद्रावती सायंकाळी 6 वा सामुदायिक प्रार्थना व चिंतन अरुण मुरकुटे यांच्या वाणीतून , सायंकाळी 7 ते 10 वा भारुड सादरकर्ते गणेश महाराज शिंदे नेरि जिल्हा वर्धा, रात्रौ 10 वा भजन सादरकर्ते नारायण बाबा भजन मंडळ भद्रावती 
दुसर्‍या दिवशी सकाळी 6 : 30 ते 7 : 30 वा भुपाळी व हरिपाठ, सकाळी 8 ते 12 वा संत शिरोमणी गोरोबा काका यांची भव्य पालखी सोहळा या शोभायात्रे मध्ये बँड पथक, झाक्या , देखावे, लेझीम पथक, भजन मंडळी, रोषणाई, आतिषबाजी, पताके इत्यादी सादर केल्या होत्या, दुपारी 1 ते 3 वा कीर्तन व गोपालकाला 
केशवाणंद मेश्राम महाराज  भद्रावती यांच्या वाणीतून , दुपारी 3 वा राष्ट्रवंदना , पसायदान व महाप्रसाद 
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता झनक चौधरी, किशोर खांदारे , कार्तिक वाणी, दिलीप खांदारे , प्रभाकर वाणी, प्रकाश वाणी, सतीश वाणी, बेलू खापनवाडे  , गणेश वाणी,शेषाणंद पांडे, रामकृष्ण खोबरे, गणपत ठाकरे, दशरथ 
वरवाडे , शामराव ठाकरे इत्यादीनि अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या