Ticker

6/recent/ticker-posts

बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसीचे यश


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाने एमएसबीटीई (MSBTE) उन्हाळी २०२६ परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील डी.फार्म प्रथम व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल नोंदवत महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केलेली आहे. डी.फार्म अंतिम वर्षामध्ये अपर्णा देशमुख हिने ८०.१८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. रोहिणी ठाकरे हिने ८०.०९ टक्के गुणांसह द्वितीय, तर विविक्षा बावणकर हिने ७७.२७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. तसेच, डी.फार्म प्रथम वर्षामध्ये साक्षी भेंडारकर हिने ७८.२० टक्के गुण मिळवून प्रथम स्थान मिळविले. नंदनी शहारे हिने ७४.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर हिमांशू लांजे याने ७३.९० टक्के गुण मिळवून तृतीय स्थान पटकाविले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या