Ticker

6/recent/ticker-posts

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अधिवेशन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली: महाराष्ट्रातील शासकीय निमशासकीय तसेच विविध महामंडळांमध्ये २००५ नंतर सेवा भरती प्रक्रियेतून गुणवत्तेचे आधारे नियुक्त झालेल्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राजव्यापी पहिले अधिवेशन २८ जून रोजी नागपुरातील सक्करदरा चौक येथील कमला नेहरू महाविद्यालयाच्या आडीटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. सकाळी १०:३० वाजता सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या अधिवेशनात पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनासमोर सादर करण्यात येणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी राहणार आहेत.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री विजय वडेट्टीवर, राजकुमार बडोले आमदार विकास ठाकरे, शिक्षक मतदार संघाचे प्रतिनिधी सुधाकर अडबाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणार आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार विविध मागण्या संदर्भात शासनाला निवेदन देऊनही निर्णय न झाल्याने ही लढाई उभारण्यात आली. या संदर्भातील याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने २४ एप्रिल २०२६ रोजी निकाल देत शासनाला बारा आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झालेल्या होत्या. या अधिवेशनातून आगामी आंदोलनाची दिशा व कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भंडारा जिल्हा प्रमुख कीर्ती डांगे यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या