Ticker

6/recent/ticker-posts

मुरमाडी /तुप परिसरात रेतीची चोरटी वाहतूक पकडली!

 ६ लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त!
एसडीपीओ  पथकाची मोठी कारवाई; सोमनाळा येथील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :- लाखणी तालुक्यातील पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजा मुरमाडी (तुप) शिवारात विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा एक विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर पोलिसांनी रंगेहात पकडला. या कारवाईत रेतीसह एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकार यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांच्या तोंडी आदेशावरून एसडीपीओ कार्यालयाचे पोलीस हवालदार मिलिंद सखाराम बोरकर (वय ४१) हे पालांदूर परिसरात गस्तीवर होते.
शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी  १:४० वाजताच्या सुमारास,  मुरमाडी/तुप शिवारात पोलिसांना एक संशयास्पद ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, लाल रंगाच्या महिंद्रा सरपंच ट्रॅक्टरला (क्र. MH 35 AR 0593) जोडलेल्या निळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे १ ब्रास रेती मिळून आली.
मुद्देमालाची किंमत  लाखांच्या घरात!
या कारवाईत पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर, दीड लाख रुपये किमतीची निळ्या रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली आणि अंदाजे ६,००० रुपये किमतीची १ ब्रास रेती, असा एकूण ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद 
ट्रॅक्टरचालक आरोपी दीपक सदाशिव तरोणे (वय ४३, रा. सोमनाळा, ता. लाखनी, जि. भंडारा) याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध पास किंवा परवाना मिळून आला नाही. त्याने चोरटी रेती भरून वाहतूक केल्याचे निष्पन्न झाल्याने, पालांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सिंगनजुडे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दोन पंचांसमक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलीस हवालदार मिलिंद बोरकर यांच्या तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी आरोपी दीपक तरोणे विरुद्ध अप.क्र. १७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ (ई)अन्वये रेती चोरीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे रेती माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या