Ticker

6/recent/ticker-posts

आपण खरंच भारतीय आहोत का?🌸🇮🇳

आपण खरंच भारतीय आहोत का?🌸🇮🇳

आपण खरंच भारतीय आहोत का?
की फक्त नावापुरतेच भारतीय आहोत?
तिरंग्याला सलाम करतो,
पण संविधानाचे मूल्य विसरतो.

देश बदलला पाहिजे म्हणतो,
पण स्वतःला बदलायला तयार नसतो.
रस्त्यावर कचरा आपणच टाकतो,
आणि सरकारलाच दोष देत बसतो.

लाच देतो, लाच घेतो,
तरी भ्रष्टाचारावर भाषण करतो.
वाहतुकीचे नियम मोडतो,
आणि अपघातासाठी नशिबाला दोष देतो.

जात, धर्म, भाषेवरून भांडतो,
मग एकतेची गाणी का गातो?
दुसऱ्यांच्या चुका मोजत बसतो,
स्वतःच्या चुकांकडे मात्र डोळेझाक करतो.

शहीदांच्या बलिदानाचा अभिमान बाळगतो,
पण देशासाठी एक पाऊलही पुढे टाकत नाही.
हक्कांसाठी आवाज उठवतो,
कर्तव्यांची वेळ आली की मागे हटतो.

आरशात एकदा स्वतःकडे पाहा,
देशाची सुरुवात तुमच्यापासूनच होते.
भारतीय असणं म्हणजे फक्त जन्म नाही,
तर प्रत्येक कृतीत भारत जपणं असते.

ज्या दिवशी आपण स्वतः बदलू,
त्या दिवशी भारतही बदलेल.
मग अभिमानाने म्हणू शकू—
होय, आता आम्ही खरे भारतीय आहोत!


लेखन  :- रुपेश पांडुरंग कुतरमारे ( उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार प्राप्त, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली) 

मो नं 9309903758

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या