चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :- वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या ( ८१ व्या ) वाढदिवसानिमित्त १० जुलै शुक्रवारला साकोली, सेंदूरवाफा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे अजून करण्यात आलेली आहे. श्याम शुश्रृषा रूग्णालय गणेश वार्ड येथे स. १० वा. नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर, उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप १०:३० ला, रक्तदान शिबिर ११ वाजता. तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण सोहळा ११:३० ला होणार असून यात सामाजिक वनीकरण साकोली व नगरपरिषद साकोली सेंदूरवाफा यांच्या संयुक्त विद्यमाने हे वृक्षारोपण कार्यक्रम सेंदूरवाफा पट दान सौजन्य पट समिती सेंदूरवाफा, संत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान परिसर सेंदुरवाफा, पंचायत समिती ते पीकेव्ही पर्यंत, प्रगती कॉलनी ते गडकुंभली रोड, तहसील कार्यालय ते गडकुंडली रोड, पशुवैद्यकीय रूग्णालय जागा गडकुंभली रोड, पीकेव्ही ते दुर्गाबाई डोह रोड, श्याम हॉस्पिटलच्या मागे गोबाडे कॉलनी ते भुवन कापगते या पांदन रोडवर वृक्ष लागवड करण्यात येईल. असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. गजाननराव डोंगरवार, नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष देवश्री कापगते व सचिव ॲड. मनिष कापगते यांनी केले आहे.


0 टिप्पण्या