Ticker

6/recent/ticker-posts

हिवताप कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा: ६ जुलैला आझाद मैदानावर "आक्रोश धरणे"

 पदोन्नतीसह विविध  मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी मुंबईत एकवटणार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती :-हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे "लक्षवेध आक्रोश धरणे/निदर्शने" आंदोलनाची हाक दिली आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या आंदोलनात राज्यातील हजारो कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष डी. एस. पवार यांनी दिली.  

दोन वर्षांपासून पदोन्नती ठप्प झाली आहे.शासन निर्णय दि. १६/०२/२०२४ अन्वये गट-क व गट-ड च्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय उपसंचालक करण्यात आले. या एका निर्णयामुळे हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी, पदोन्नती, बदल्या आणि बिंदू नामावली यामध्ये प्रचंड गुंतागुंत निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकाही कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी प्रमुख मागणी आहे.  
मा. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि. ०८/०४/२०२६ रोजी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र तीन महिने उलटूनही त्या निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.  
संघटनेच्या सहा प्रमुख मागण्या*:   दि. १६/०२/२०२४ चा शासन निर्णय रद्द करून पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा.  
अन्यायकारक बदल्या रद्द करण्यात याव्यात.नागपूर विभागातील दि. १५/०४/२०२६ रोजी समूपदेशनाने  केलेल्या अन्याकारक बदल्या त्वरित रद्द कराव्यात.  
 आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य निरीक्षक संवर्गाची रखडलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ सुरू करून आरोग्य कर्मचारी पदाच्या कोट्यातील रिक्त जागांवर पात्र क्षेत्र कर्मचाऱ्यांना विनाअट पदोन्नती द्यावी.  
 क्षेत्र कर्मचाऱ्यांचा सध्याचा रु. १५०० कायम प्रवास भत्ता वाढवून रु. ५००० करावा.  
 आरोग्य कर्मचारी संवर्गाचे 'ग्राम आरोग्य अधिकारी' आणि आरोग्य पर्यवेक्षक यांचे 'विस्तार अधिकारी (हिवताप)' असे पदनाम करावे.  
  संघटनेने दि. ०३/०४/२०२६ रोजी दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.  
*हिवताप विभागातील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात  
, "हिवताप, हत्तीरोगासारख्या साथीच्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी आमचे कर्मचारी दुर्गम, आदिवासी व डोंगराळ भागात जीवाची पर्वा न करता सेवा देतात. पावसाळ्यात नदी-नाले तुडवत, साप-विंचवांच्या भीतीत ते घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने घेतात. मात्र, शासनाकडून त्यांच्या मूलभूत मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार निवेदने देऊनही दाद मिळत नसल्याने नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागत आहे."  
संघटनेने राज्यभरातील सर्व हिवताप कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि हक्कांसाठी एकजुटीने या आंदोलनात सहभागी होण्याचे  आवाहन डी एस पवार प्रदीप चंदे,पुरुषोत्तम आडेप, दीपक गोतमारे, लक्षण मराठे, अशोक संकपाळ,सतीश कांबळे यांनी केले आहे. या आंदोलनानंतरही शासनाने दखल न घेतल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या