चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई :-परिस्थितीची कारण न देता हालाखीच्या परिस्थिती शालेय शिक्षण पुर्ण करून शिक्षणाचा दर्जा राखत औद्योगिक तंत्रज्ञान प्रशिक्षण घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका, "बी" वार्ड कार्यालयमध्ये किटकनाशक विभागामध्ये अधिकारी पदावर कार्यरत राहून नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय राहणारे, सर्वोत्तम समालोचक, निवेदक, कवी, लेखक, गायक आणि बौध्दाचार्य म्हणून अष्टपैलू जीवन जगत इतरांमध्ये नेहमी उत्साह निर्माण करणारे *आयु. सुनिल आनंदा ओव्हाळ साहेब* दि. ३० जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकामधून सेवानिवृत्त झाले,
त्यानिमित्ताने बिएमसी, बी वार्ड कार्यालमधील सभागृहामध्ये आयोजित *"सेवानिवृत्त समारंभ"* कार्यक्रमामध्ये परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्यांचा आधारवड *"प्रज्ञाज्योती सोशल फाऊंडेशन"* नावे *'पाच हजार रुपयांचा धनादेश'* संस्था संचालक आयु. जितेंद्र स. कांबळे गुरूजी यांच्याकडे सुपुर्द करून *"शासकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीतून सामाजिक दायित्वाचा"* एक नवा पायंडा निर्माण केला.
बऱ्याचदा शक्य असूनही सामाजिक दायित्वापासून अनेकजण दूर राहतात.
परंतु, किमान सेवानिवृत्त निमित्ताने तरी सामाजिक कर्तव्य बजावावे, हा संदेश ह्यानिमित्ताने सुनिल ओव्हाळ सरांनी सर्वांना दिला.
त्याबद्दल *प्रज्ञाज्योती सोशल फाऊंडेशन* तर्फे *संस्था संचालक जितेंद्र कांबळे गुरुजी* यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करत *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरी असलेला पेन* बहाल केला.


0 टिप्पण्या