Ticker

6/recent/ticker-posts

अंभोरा येथील पर्यटन स्थळी वारकरी भवन उभारण्याकरिता जागा व निधी उपलब्ध करून द्या- ह. भ .प.ओमदेव महाराज चौधरी

चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर -तीर्थक्षेत्र अंभोरा तालुका कुही जिल्हा नागपूर येथे भगवान चैतन्य स्वराचे पुरातन मंदिर  आहे . तसेच येथे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांचे स्मृतीस्थळ असून वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते व अनेक दिंड्या  या ठिकाणी येत असतात .त्यांच्या निवासाच्या व्यवस्थेसाठी वारकरी भवन मंजूर करण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रद्धा ,हुंडाबळी इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये लोकजागृतीचे काम व प्रचार कीर्तनकार व कथाकार करीत आहेत . त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान व्हावा  यासाठी भक्तशिरोमणी नामदेव महाराज किर्तनकार मानधन योजना सुरू करण्यात यावी, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेच्या भक्तीचा ,संस्काराचा व सामाजिक ऐक्याचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असून परिसरात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हरिनाम सप्ताह ,कीर्तन, भजन, प्रवचन, पारायण तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने आयोजन करण्यात येतात .सदर ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी भाविक व नागरिक येत असतात .परंतु बाहेरून येणाऱ्या वारकऱ्यांच्या निवास, विश्रांती व धार्मिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र वारकरी भावनांची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्याच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होते .मंदिर किंवा कार्यक्रम स्थळी मर्यादित जागा असल्यामुळे अनेक भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी स्वतंत्र वारकरी भवन उभारणी काळाची गरज बनली आहे .सदर वारकरी भावनांचा उपयोग पुढील प्रमाणे होऊ शकतो. वारकरी व भाविकांच्या निवास व विश्रांतीसाठी हरी किर्तन, भजन ,प्रवचन व नामस्मरणासाठी संत साहित्य व वारकरी संस्कार प्रसारासाठी धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्याकरता बाहेरगावी येणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार भाविकांच्या सुविधेसाठी युवक व बालकांमध्ये संस्कार सदाचार व संत विचार उजविण्यासाठी वारकरी भवन एक केवळ एक इमारत नसून संत परंपरा संस्कार भारती आणि सामाजिक ऐक्य जपणारी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, नागपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष आनंदराव राऊत यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे ह भ प ओमदेव महाराज चौधरी यांनी  नागपूर जिल्ह्यातील वारकरी मेळाव्यात वेलतुर येथे केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या