स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी जयंती दिनी असलेल्या बालदिनामित्त साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
*बालदिन*
जीवनातील सुंदर ।
काळ हा बालपणाचा ॥
बैठे नि मैदानी खेळ।
मनसोक्त खेळण्याचा ॥
आजच्या मुला मुलींचे ।
बालपण हरवले आहे ॥
मोबाईलच्या युगात ।
संवाद हा कुठे आहे ? ॥
लहानपणाचे दिन ।
येतील का हो पुन्हा ? ॥
मजा मस्ती करायला ।
मिळेल का हो पुन्हा ? ॥
बालपणीचे दिवस ।
होते खूपच मजेचे ॥
नाही चिंता,नाही दुःख ।
स्वच्छंदी हे जगण्याचे ॥
चौदा नोव्हेंबर दिनी ।
असतो हा बालदिन ॥
पंडितजी नेहरूंचा ।
असतो हा जन्मदिन ॥
बालदिनी बालकांना ।
गोड हार्दिक शुभेच्छा ॥
मोदमय जीवनाच्या ।
माझ्या मनस्वी सदिच्छा ॥
राज्यस्तरीय संत कबीर
कवीराज पुरस्कार प्राप्त
कवी व साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
काँग्रेस नगर,अमरावती.
भ्र.ध्व. : ८०८७७४८६०९


0 टिप्पण्या