Ticker

6/recent/ticker-posts

बोगस पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याने जमवली करोडोंची माया


फरार शैलेंद्र द्विवेदी याला नवी मुंबई पोलिसांकडून लोणावळ्यातून अटक

नवी मुंबई: स्वतःला सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ता आणि पत्रकार भासवून नागरिकांची फसवणूक व खंडणी उकळणाऱ्या शैलेंद्र द्विवेदी याला नवी मुंबई पोलिसांनी लोणावळ्यातून ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकताच फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या द्विवेदीचा शोध घेत पोलिसांनी लोणावळ्यात सापळा रचून त्याला अटक केली.

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, पत्रकार आणि माहिती अधिकारातील कागदपत्रे असल्याचे खोटे भासवून त्याने अनेकांकडून करोडो रुपयांची खंडणी वसूल केली आहे. या अवैध पैशातून त्याने करोडो रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे उघड झाले आहे. ही बेनामी व अवैध संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या