Ticker

6/recent/ticker-posts

किरणापुर येथे रंगला दुय्यम खडा तमाशा.


 

 रामटेक : तालुक्यातील किरणापूर (काचुरवाही )  येथील नवयुवक मंडळ, समस्त ग्रामवासीयाच्या वतीने दीपावली व कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 16 ते 18 नोव्हेंबर  दरम्यान तीन दिवसीय  " भव्य मंडई  उत्सव साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जनजागृती त्रिगुण निशान पार्टी आडका चे सुप्रसिद्ध शाहीर मारुती मारबते विरुद्ध वैभव सांस्कृतिक कला मंडळ तुरा निशा न चे सुप्रसिद्ध निनाद बागडे यांच्या दुय्यम खडा तमाशा चांगलाच रंगला होता. सदर कार्यक्रमाला दूर दुरून पाहुण्याची गर्दी जमली होती. सुंदर असे गाणे कला कौशल्य दोन्ही शाहिरांनी सादर केले. कार्यक्रमाचा आस्वाद सर्व पाहुण्यांनी व महिला मंडळ गावकऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन वांदे, स्वप्निल हुड,भिमशाहिर / पत्रकार प्रदीप कडबे, यांच्यासह  समस्त आयोजन कमिटी, गावकरी पाहुणे मंडळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या