Ticker

6/recent/ticker-posts

बस मधून रोख रकमेसह शैक्षणिक कागदपत्राची चोरी


• साकोली ते लाखनी दरम्यान ची घटना 

• महिला प्रवाशाच्या १० हजार रुपयाची चोरी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा :- वनरक्षक भर्ती ची परीक्षा देण्यासाठी साकोली नागपूर बस ने प्रवास करीत असताना अचानक पर्सकडे लक्ष गेल्याने चैन खुली दिसल्यामुळे पर्स तपासली असता १० हजार रुपये व शैक्षणिक कागदपत्र चोरी झाल्याची घटना सोमवारी(ता.३१) ला उघडकीस आली. महिला पोलिसांकडून प्रवाशांची अंगजळती घेऊन काहीच मिळाले नसल्याने बस समोरचे प्रवासाकरिता रवाना करण्यात आली. मयुरी फत्तू शेंडे(२०), रा. साकोली असे चोरी झालेल्या महिला प्रवाशाचे नाव आहे. 
             साकोली आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८५४४ ही साकोली वरून नागपूर ला जात होती. महिला प्रवाशी मयुरी शेंडे ही वनरक्षक परीक्षेला जाण्यासाठी रोख रक्कम व शैक्षणिक कागदपत्र घेऊन नागपूर ला जाण्यासाठी बसमध्ये चढली. साकोली पार केल्यानंतर मयुरी चे लक्ष तीचेकडे असलेल्या पर्सकडे गेले असता चैन खुली असल्याने पर्स तपासली असता १० हजार रोख व शैक्षणिक कागदपत्रे चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्याने तिने धावत्या बस मध्येच रडणे सुरू केले. ही बाब बस वाहकाचे निदर्शनास येताच त्याने बस थेट लाखनी पोलिस ठाण्यात आणली व पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महिला पोलिस हवालदार सरिता कोटांगले व महिला पोलिस शिपाई प्रगती वैद्य यांना बस मधील प्रवाशांची अंगझळती व सामानाची तपासणी करण्याच्या सूचना केल्या. पण चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला नाही. त्यामुळे चोरी बसस्थानक किंवा बस वर चढते वेळी गर्दीचा फायदा घेऊन झाली असावी असा पोलिस कर्मचाऱ्यांनी प्राथमिक अंदाज वर्तविला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी महिला प्रवाशास तक्रार दाखल करण्याविषयी विचारणा केली असता १ ऑगस्ट वनरक्षक परीक्षा असल्याने जाण्यास उशीर होत असल्याचे कारण सांगून ती त्याच बस ने नागपूर कडे मार्गस्थ झाली. गर्दीचा फायदा घेऊन बसस्थानक किंवा बस मध्ये चढते वेळी प्रवाशांच्या रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरी होण्याचे घटनांत सातत्याने वाढ होत असल्यामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या