Ticker

6/recent/ticker-posts

चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा

 ठाणेदार गणेश पिसाळ यांचे जनतेला आवाहन 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- लगतच्या ग्रामीण पोलिस स्टेशन कारधा अंतर्गत  येणाऱ्या कारधा, आंबाडी, भिलेवाडा , गिरोला, सिल्ली, मानेगाव, टेकेपार, झबाडा, बोरगाव , दवडीपार, पालगाव, अर्जुनी (पुनर्वसन), सालेबर्डी, सिरसघाट  भागात चोरीचे प्रमाण वाढले असून नुकत्याच वाटमारी करून  मारहाण झाल्याच्या घटनेमुळे परसरात दहशत निर्माण झाली आहे, वाढत्या घटनांमध्ये  वाटमारी,लोहाचोरी, गाडी चोरी, सायबर क्राईम चोरीचे प्रमाण वाढले असून त्यावर आळा घालण्यासाठी ठाणेदार  गणेश पिसाळ यांनी लोकसंख्येच्या  प्रमाणात पोलिसांची दोन टप्प्यात गस्त वाढविली असून पहिल्या टप्प्यात रात्री 9ते 10 तर रात्री 10पासून मध्य रात्री 2नंतर पर्यंत गस्त व पोलिस कर्मी काम पहाणार आहेत त्यांच्या सोबत पोलिस पाटील आणि गटा गटाने ग्रामीण युवकांनी पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन कारधा पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी केले आहे. प्रत्येक गावात ग्रामवासियांची सभा आयोजीत करून जण जागरण केले जात आहे.
                 कारधा पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी जनतेचे म्हणणे जाणून घेतले  तेव्हा ग्रामीण पोलिस स्टेशन शहरात कसे ?असा सवाल व्यक्त केला गेला. जेव्हा कारधा पोलिस स्टेशन कारधा टोल येथे होता  तेव्हा वर्धीच्या धाकाने चोरीच्या प्रमाणावर आळा होता, सध्या बाहेरच्या लोकांचे वास्तव्य दिसू लागले आहे.  त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.ग्रामीण भागातील मुल आय. पी. एल . मोबाईल च्या. नादात कर्ज बाजारी झाले असल्याने लोहा चोरी करत असल्याचे सांगीतले जाते. बाजाराच्या दिवशी पोलिस बाजारात उभे दिसले की, कोणाचा पॉकिट मारला जात नव्हता. म्हणून बाजाराच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त असले पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यावर जनतेचे समाधान करत पोलिस अधिकारी गणेश पिसाळ यांनी बाजाराच्या दिवशी पोलिस देणार , प्रत्येक ग्रामपंचायत ने  पुढाकार घेऊन राष्ट्रीय महामार्गावर इमारत बांधकाासाठी सहकार्य केले तर पोलिस चौकी देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगीतले. अनेक ग्रामपंचायत व्दारा ग्रामीण भागात पोलीस स्टेशन स्थलांतरित करण्यासाठी  आपण पोलिस अधिक्षक यांचे कडे मागणी करु अशे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते यांनी दिले.
                   या सभेला पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, जिल्हा परीषद सदस्य विनोद बांते, आंबाडी ग्रामपंचायत सरपंच भजन भोंदे, शेखर बोरकर, पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी,पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे, प्रदीप जगनाडे,रमेश काळे, प्रमोद आरीकर , विनायक साठवणे, संदीप केंद्रे, गभने प्रामुख्याने उपस्थीत होते तर पोलिस पाटील  लक्ष्मण बावनकर, विजुभाऊ राघोर्ते, भगवान साखरवाडे,, सौ. दुर्गाबाई शेंडे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय भुरे आदीच्या उपस्थीत सभा घेण्यात आली यावेळी बऱ्याच संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या