खरीप हंगाम २०२४ मध्ये चांगले उत्पादन होण्याची आशा
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- खरीप हंगाम २०२३ मध्ये कमी पर्जन्यवृष्टी तसेच धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव त्यामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने शेतकरी हवालदिल झाला असला तरी खरीप हंगाम २०२४ मध्ये चांगले पीकपाणी येईल. या आशेने शेतकरी पेरणी पूर्व मशागतीचे कामाला लागला आहे. रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली असल्याने पाऊस येईल. या आशेने शेतकरी पेरणी पूर्व मशागतीच्या कामाला लागला असून शेतात शेणखत टाकने, शेतातील कचरा पेटवणे. रोपे(पऱ्हे) भरणीची जागा नांगरणी अथवा वखरणी करणे. तसेच बि-बियाणाचे व्यवस्थेस बळीराजा लागला असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
लाखनी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३३ हजार १७३.३६ हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ६९० हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगाम २०२४ मध्ये २२ हजार ६३१ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रात रोवणी तर ६९८ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईल. अशी शक्यता गृहीत धरून धान उत्पादक शेतकऱ्यांने शेतात खात टाकने शेतातील धुरे पेटविने, शेतात असलेली काटेरी झाडेझुडपे, बांधाच्या धुऱ्यावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापणे. तसेच रोपे(पऱ्हे) लागवडीकरीता असलेल्या जागेची नांगरणी व वखरणी सुरू केल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामात बि-बियानाची सोय करता यावी. याकरिता वित्तीय संस्थांकडून पीक कर्जाच्या सोयीसाठी शेतकरी व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
0 टिप्पण्या