श्रीकांत बारहाते चित्रा न्युज
हिंगोली:- वसमत तालुक्यातील आरळ गावच्या वळणावर मध्यरात्री तीनच्या सुमारास दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करून त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये जबरदस्तीने काढून धारदार शस्त्राचा धाक दाखवून सहाजणांनी लुटले याप्रकरणाची हट्टा पोलिसांना मिळाल्यानंतर चार तासात आरोपीचा शोध घेतला असून सहाजणांना ताब्यात घेतले आहे त्यामध्ये विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे जितुसिंग प्रेमसिंग राजपुरोहित रा.श्रीकृषण नगर वसमत हे वसमत ते आरळ मार्गावर आरळ वळणावर दुचाकीवरून वसमत कडे जात असताना आरळ वळणावर मध्यरात्री तीनच्या सुमारास विना नंबरच्या गाडीवरून सहाजनानी अडवीले त्यांना मारहाण करीत धारदार खंजीर व कतीचा धाक दाखवून त्याच्या जवळील 10 हजार रुपये जबरदस्तीने काढून पळून गेले या घटनेची माहिती हट्टा पोलिसांना मीळ्यानंतर सपोनी.गजानन बोराटे यांच्या पथकाने तपासायची चक्रे गतीमान करीत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या चार तासात हट्टा पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर बालाजी लोखंडे रा.पिंपळा लोखंडे ता.पुर्णा बालाजी काशिनाथ पवार रा. अव ई ता.पुर्णा साईनाथ लक्षमन कदम रा. हडको नांदेड आदित्य प्रदिप चौदंत रा. वैभव नगर नांदेड यांच्यासह दोन विधिसंघर्ष बालकाना ताब्यात घेतले आरोपींकडून गुन्ह्यातील दोन विनानंबरच्या दुचाकी तसेच शस्त्रे व 10 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन बोराटे पोलिस उपनिरीक्षक प्रसेनजीत जाधव जमादार गणेश सुर्यवंशी कृष्णा चव्हाण वनराज पाईकराव मारोती गडगीळे संदिप सुरूसे सुर्यकांत भारशंकर प्रफुल्ल आडे शेख इक्बाल यांनी सहकार्य केले आहे
0 टिप्पण्या