Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांचा भव्य सत्कार

रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
नागपूर :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती उत्सवात भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केल्या गेला होता.त्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रूती समीती महीला अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर हुडकेवर रोड नागपूर येथे सत्कार करण्यात आला.हा सत्कार डॉ सौ सुनिता विकास महात्मे स्त्रीरोगतज्ज्ञ व श्री महादेवराव पातोंड निव्रुत्त अधिकारी सुप्रीटेंन्डट आॅफ सेन्ट्रल एक्साईज डिपार्टमेंट व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रूती समीती सचिव यांच्या हस्ते करण्यात आला.आणी पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.वंदना विनोद बरडे यांनी या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतिच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपलीं सामाजिक जबाबदारी म्हणून आपण रक्त दान, देह दान ,नेत्र दान ,अवयव दान ,करण्याचें आवाहन केले आहे .आणि अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांना , आदर्शांना जगासमोर आणुन त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न करावेत.असे आवाहन केले आहे.अहील्यादेवी म्हणजे एक आदर्शांचा ,विचारांचा एक खजिनाच आहे त्या आदर्शवत विचारांना आदर्शांना आपण आपल्या जीवनात वापरला पाहिजे.जगातील एकमेव महीला राजकारणी ज्यांनी सर्वात जास्त काळ २९ वर्षं आदर्श राजकारण केले.त्यांच्या विचारधारा ना समोर नेवू या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या