संजीव भांबोरे भंडारा
भंडारा :-महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृति आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकांचा समावेश करण्यात आल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली आहे.( संदर्भ- लोकसत्ता 24 मे 2024, मुंबई आवृत्ती ). यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि दासबोधाचा समावेश करून सरकारला विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे आहे असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. मनुस्मृति हा हिंदू धर्मातील समस्त बहुजन समाजाचा अपमान करणारा आणि त्यांना हीन लेखनारा ग्रंथ आहे. तसेच मनुस्मृतीने हिंदू धर्मातील समस्त स्त्रियांना जनावरापेक्षाही खालचा दर्जा दिलेला असून स्त्रियांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार नाकारले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना सुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रचंड विरोध झालेला आहे.सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याला सुद्धा मनुस्मृतीचा आधार घेऊनच प्रतिगाम्यांनी विरोध केलेला होता. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रायगडाच्या पायथ्याशी महाडला मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते.
अशा विषमतावादी ग्रंथातील श्लोक विद्यार्थ्यांना शिकवून त्यांच्या मनात जातीयवाद आणि विषमता सरकारला निर्माण करायची आहे का ? तसेच रामदास स्वामीचा 'दासबोध' हा ग्रंथ सुद्धा विषमता निर्माण करणारा असून त्या ग्रंथांमध्ये 'गुरूंची लक्षणे' या अध्यायात बहुजन समाजाला अध्ययन आणि अध्यापन करण्याचा अधिकार नाकारलेला आहे. तसेच बहुजन समाजातील कोणीही व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही, फक्त ब्राह्मण समाजातील व्यक्तींनाच शिक्षक होण्याचा अधिकार आहे असे रामदास स्वामी यांनी स्पष्टपणे म्हटलेले आहे. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडी वतीने या दोन्ही ग्रंथांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला जाहीर विरोध करीत आहोत.त्याऐवजी भारताची राज्यघटना अभ्यासक्रमात समाविष्ट करून दरवर्षी राज्यघटनेचे वेगवेगळे भाग विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर तुकोबांची अभंगगाथा, राष्ट्रसंतांची ग्रामगीता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करावे अशी आमची सरकारला जाहीर मागणी आहे.सरकारने आमच्या मागणीचा ताबडतोब विचार करून अभ्यासक्रमातून मनुस्मृति आणि दासबोध ताबडतोब हटवावे.अन्यथा वंचित बहुजन आघाडी शिक्षण विभागावर मोर्चा नेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असे
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे ,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी तालुका महिला महासचिव शीतल नागदेवे, रेखा रामटेके, अमित वैद्य,त्रिवेणी मेश्राम व इतर तालुक्याचे सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
0 टिप्पण्या