नामांकित बैल जोड्या चे आगमन
चित्रा न्युज ब्युरो
तळेगाव दशासर :-कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित रविवार 15 जानेवारी रोजी झालेल्या दो दाणी शंकरपटाच्या आयोजनानंतर आज एक दाणी शंकर पटाला प्रारंभ झाला यावेळी एकदानी शंकर पटाचे उदघाट्न आमदार प्रताप दादा अडसड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी माजी खासदार रामदासजी तडस, मनोजभाऊ डहाके, तसेच कृषक सुधार मंडळाचे शिवाजीराव देशमुख,अशोकराव गायकवाड भूपेंद्र नाईकनिंबाळकर अनंतराव बगाडे,, कृषक सुधार मंडळाचे आनंद देशमुख, पंकज गायकवाड,ठाणेदार रामेश्वर धोंडगे,इत्यादी मान्यवरचे कृषक सुधार मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी भारतीताई चुटे, गवळी ताई तसेच शारदामाता महिला भजनी मंडळाच्या महिला यावेळी उपस्थित होत्या.
तसेच संदीप वैद्य, प्रशांत साखरकर, संजय हागे, विवेक सराफ, किशोर मेश्राम, विकास नवरंगे, पोमेश थोरात, रवी भाऊ चुटे,दिलीप पेंदाम, सुनील भिवरकर, माणिक बगाडे,अशोकराव गायकवाड इत्यादी यावेळी उपस्थित होते.
विविध ठिकाणाहून नामवंत जोड्या चे आगमन झाले आहें
एकदानी शंकर पटामध्ये अ गट व क गट या दोन्ही गटा मध्ये विजय मिळविण्यासाठी चुरस आपल्याला पाहायला मिळाली असून एकदानी स्पर्धेत बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
*पटप्रेमी प्रेक्षकांच्या गर्दी ने गाठला उच्चाक*
विविध ठिकाणावरून आलेल्या नामांकित बैल जोडी पाहण्याकरिता आलेल्या प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाला
प्रेक्षकांनी तुफान गर्दी चा जणू आज उच्चाक आज गाठल्या चे दिसून येत होते
आज झालेल्या एकदानी पटामध्ये देवा - तेजा,मिसाईल- गोविंदा, बारूद -गुल्की, सुलतान -देवा, सोनपापडी -सरकार,कृष्णा -टिकली, राजा -शिवा फायर -बालमा,
इत्यादी बैल जोड्या सहभागी झाल्या असून 16 व 17 जानेवारी रोजी होणाऱ्या एकदानी विजयाचा मानकरी कोण होणार याकडे लक्ष लागले आहें उद्या दि.17 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असून कोन ठरणार विजयाचे मानकरी याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शेती उपयोगी साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री
या शंकरपटात मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी साहित्य आलेले आहें या मध्ये दोर, दोरखंड लाकडाचे साहित्य, काड्या, तडव व शेती उपयोगी साहित्य उपलब्ध साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध असून शेतकरी त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे.
तसेच मनोरंजनासाठी विविध विविध प्रकारच्या झुले आले असून लहानमुले व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहें.
आता लक्ष वेधले आहे 17 जानेवारी रोजी होणाऱ्या बक्षीस वितरणात कोन बाजी मारणार या कडे गावकर्यांचे लक्ष लागले आहें.
0 टिप्पण्या