चित्रा न्युज ब्युरो
छत्रपती संभाजीनगर :- जिल्हास्तरीय रासायनिक दुर्घटना आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक आज एचपीसीएल कंपनीच्या आवारात आयोजित करण्यात आले. या आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकात ३०० जणांनी सहभाग घेतला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या वतीने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. रासायनिक दुर्घटनेत विविध शासकीय, निमशासकीय, व इतर विभागांमध्ये समन्वय कसा साधला जावा, त्यांच्या जबाबदाऱ्या व रासायनिक दुर्घटनेत आपत्ती व्यवस्थापन कार्य हाताळणी याबाबत हे प्रात्यक्षिक होते. यावेळी निदर्शनास येणारे अडथळे, कमतरता यांचे विश्लेषण करून पुढील काळात त्यावर मात करणे इ. अभ्यास करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापना विषयी जनजागृती आणि संबंधित विभागांचे क्षमता वर्धन करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
अमोनिया गॅस टँकरचा अपघात व गॅस गळती , LPG टँकरचा अपघात व गळती असे दोन घटनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यात अग्निशमन विभाग त्यांचे दोन पथके सहभागी तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एकूण ३२ जवान होते. त्यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. साधन व्यक्ती विजय पाटील, राजू ठोंबरे, श्रीमती बेबी किरण अहिर, मेजर मर्डेकर कृष्णा यांच्या नेतृत्वात पथके प्रशिक्षण घेत होती. याप्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती मस्के, सहायक कमांडंट निखिल मुधोळकर, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक प्रमोद सुरसे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा खिरोडकर, अग्निशमन विभाग प्रमुख पाटील,अमित दगडे, अमिलेश राव तसेच आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वाहतुक विभाग, पोलीस दल इत्यादी विभागाचे ३०० हून अधिक व्यक्तिंनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.
०००००
0 टिप्पण्या