Ticker

6/recent/ticker-posts

गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय , तुमसर तर्फे 'राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर' संपन्न


चित्रा न्युज ब्युरो
 भंडारा :- गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय ,तुमसर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे " डिजिटल साक्षरते करिता  युवा " या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन दि. 6 जानेवारी ते  12जानेवारी 2025 या दरम्यान नवरगाव, ता. तुमसर येथे आयोजित करण्यात आले होते. दि. 7 जानेवारी 2025  ला महाविद्यालयीन विशेष शिबिराचे उद्घाटन मा. श्री प्रजेश जयपालजी  लाडसे, सरपंच नवरगाव यांच्या शुभहस्ते झाले.
 मा.श्री नारायणरावजी तितीरमारे, संस्थापक ,श्री सुदामा शिक्षण संस्था, तुमसर यांनी अध्यक्ष पद भूषविले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री प्रमोदभाऊ तितीरमारे  ,सचिव श्री सुदामा शिक्षण संस्था, तुमसर, मा. श्री प्रेमलाल चिंतामणजी  तुमसरे ,माजी उपसरपंच परसवाडा ,  तसेच मा.श्री निलेश गोपीचंद गुरवे ,उपसरपंच नवरगाव, मा. श्री अश्विन डोहळे,ग्रामसेवक नवरगाव ,मा.सौ मीनाक्षी चंद्रशेखर लाडसे  ,पोलीस पाटील नवरगाव व समस्त ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . सरपंचांनी शिबिराच्या उद्घाटनाची विधीवत घोषणा करून शुभेच्छा  दिली.कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. मुबारक कुरैशी यांनी केले तर आभार कु.रूपाली बनसोड हिने मानले. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे योगशिक्षक श्री सुजय भुरे ,साई श्री योग व ध्यान क्लास, तुमसर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दररोज घेण्यात आलेले योग शिबिर होय . तसेच डिजिटल साक्षरता, आरोग्य ,स्वच्छता ,मतदान जनजागृती ,अंधविश्वास , स्त्री -शिक्षण, स्त्री -पुरुष समानता,   इतर विषयावर जनजागृती करिता रोज सकाळी पोस्टर्स, घोषवाक्य च्या माध्यमातून तसेच लेझीम व ढोलच्या प्रयोगातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले .सरपंच  ,उपसरपंच व इतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तसेच गावकऱ्यांच्या सहभागाने ग्राम स्वच्छता अभियान घेण्यात आले. पी एच सी देवाडी ,उपकेंद्र बामणी  च्या सौजन्याने भव्य आरोग्य निदान शिबिर सुद्धा आयोजून त्यात बीपी, सी व्ही सी, थायरॉईड यासाठी रक्त तपासणी करण्यात आली व मोफत औषध वाटप सुद्धा करण्यात आले. शिबिरा अंतर्गत डिजिटल साक्षरता, बाल योन शोषण ,कौटुंबिक हिंसाचार अशा वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.  शिबिरार्थींनी ग्राम सर्वेक्षण करून गावातील प्रत्येक घरी सांडपाण्याचे व कचऱ्याचे व्यवस्थापन, शोष खड्डे, व्यक्तिगत शौचालय व परसबाग यासंबंधी माहिती गोळा करून अहवाल ग्रामपंचायतीत सादर  केले.  नवरगाव महिला बचत गट मेळावा सुद्धा शिबिरा अंतर्गत आयोजित करण्यात आला . मेळाव्याचे औचित्य साधून बचत गटाच्या महिलांनी व जि. प. पू. मा. शाळा, नवरगाव च्या विद्यार्थ्यांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयं सेविकांनी समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.  या शिबिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात समाज प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. विशेष म्हणजे महाविद्यालयाची  द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. रुची मेहर हिने आपल्या सुमधुरवाणित किर्तन  सादर करून  समस्त ग्रामवासीयांना  मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी सरपंच व पोलीस पाटील, नवरगाव यांनी कु .रुची मेहर चे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले. दि. 11 जानेवारी 2025 ला शिबिराचे समारोपीय कार्यक्रम संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून मा .श्री विनोद नारायणरावजी  तीतिरमारे , नवरगावचे सरपंच ,उपसरपंच ,
ग्रामसेवक ,पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. मुबारक कुरेशी यांनी केले तर आभार स्वयंसेविका कु. रजनी सयाम हिने मानले. शिबिराच्या यशस्वीते करिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  प्रो .डॉ.मुबारक कुरेशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज सेलोकर , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका  कु. रूपाली बनसोड, कु.बंदिनी नेवारे, कु. दिपाली गोपाले, कु.नेहा गोपाले, कु. वैष्णवीअवथरे, कु.शर्वरी पंचबुद्धे, कु.निलोफर पठाण, कु. हिना नागोसे, कु.कशिश मते, कु. दीक्षा निनावे ,कु. प्राची पिकल मुंडे,  व इतर स्वयंसेविकांनी अथक परिश्रम घेतले.
प्रेषक :मुबारक कुरेशी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या