Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तिपीठ महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. तालुकाध्यक्ष योगेश पाटील

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर :-प्रस्तावीत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गात जमीनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गात जे भूमिहीन होणार आहेत त्यांना पर्यायी जमीन उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे. तसेच महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला उपलब्ध करून देण्यात यावा त्याचप्रमाणे सदर शक्तीपीठ महामार्गात गेल्या काही दिवसात एजंट व दलालांचा सुळसुळाट झाला असून या माध्यमातून नोटरी करार करून व प्रत्येक शेतकऱ्यांकडुन दोन चेक घेऊन शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होणार असल्याचे दिसून येते तरी या दलालांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्यावतीने केली. यावेळी तालुकाध्यक्ष योगेश पाटील, माऊली हळणवर, भाजपा नेते राहुल केदार, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सरपंच दत्तानाना फरड, महेश पाटील, प्रविण पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या