संतोष देशमुख,शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देणारच
चित्रा न्युज ब्युरो
बीड :जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ रविवार, दि. 19 जानेवारी रोजी सकल मराठा समाज आयोजित सर्वधर्मीय, सर्वपक्षीय जन आक्रोश मोर्चास रिपब्लिकन सेनेने पाठिंबा जाहीर केला असून रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब हे स्वतः या मोर्चास उपस्थित राहणार आहेत. शिवाय मराठवाड्यातील रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दि.१३ जानेवारी रोजी स्वतः आनंदराज आंबेडकर यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वन केले व जोपर्यंत देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द दिला होता शिवाय सोमनाथ सूर्यवंशी हे संविधानाच्या रक्षणार्थ शहीद झाले असून त्यांना न्याय मिळवून देणारच अशी भूमिका आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केली आहे.
रविवार, दि. 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगरपर्यंत काढण्यात येणाऱ्या जन आक्रोश मोर्चात समस्त आंबेडकरी पक्ष-संघटना, संस्था तसेच भीमसैनिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य सुनील वाकेकर, डॉ. सुशील सूर्यवंशी, चंद्रकांत रुपेकर, सचिन निकम, मिलिंद बनसोडे, प्रा. सिद्धोधन मोरे, काकासाहेब गायकवाड, अस्कर खान, विकास हिवराळे, रामराव नरवडे आदींनी केले आहे.
0 टिप्पण्या