चित्रा न्युज ब्युरो
लातूर:- माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर आपणास आह्मी आनेकदा या संदर्भात निवेदन देऊन कळवले आहे की रमाई आवास घरकुल योजनेच्या शासकीय निधी अपुरा पडत असून या निधीत ग्रामीण व शहरी भागात रमाई अवास योजेणेच्या शासन निधीत वाढ व्हावी म्हणून दिनांक२१० ऑक्टोबर २०२२ रोजी आपणास पाहिले निवेदन देऊन मागणी केली होती याचा कसलाच विचार केला गेला नाही म्हणून पुन्हा आपणास स्मरण निवेदन ६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे स्मरण निवेदन देण्यात आले आहे.
या संदर्भात आपण तातडीने निर्णय घेऊन आम्हाला कळवणे गरजेचे असताना ही आपण आम्हला कसलाच प्रतिसाद दिला नाहीत म्हणून पुन्हा दिनांक १६ जानेवारी रोजी आपणास निवेनद्वरे कळवत आहोत की आपण २५ जानेवारी पर्यंत सदरील निवेदनाची दखल घेऊन निर्णय कळवावा अन्यथा २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळवले आहे यावेळी निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, जिल्हा प्रमुख विलास अण्णा चक्रे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, अशोक गायकवाड, मुकेश पवार,अविनाश कांबळे ,रितेश सूर्यवंशी, रवी जगताप, रहिम शेख, आदी कार्यकर्त्याचा निवेदनावर स्वाक्षरी आहेत
0 टिप्पण्या