चित्रा न्युज ब्युरो
मुझफ्फरपूर - शेतकरी शेतात राबतात म्हणून आम्हाला अन्नधान्य मिळू शकते.शेतकऱ्यांच्या जीवावर देश जगत आहे .नसेल किसान तर कसे होईल जीवन आसान ? त्यामुळे शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूत उभे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पादनाला किमान आधारभूत किंमत एस एस पी निश्चित करून शेतीशी जोडलेल्या विविध शेतीउद्योगांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.बिहार मधील मुझफ्फरपूर येथील मोतीपुर गावात कोल्ड स्टोरेज आणि वेरहाऊस
चे उद्घाटन ना.रामदास आठवले यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले त्यावेळी झालेल्या सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैशाली जिल्ह्याच्या खासदार वीणा देवी; बिहार चे पंचायत राज्य मंत्री केदार प्रसाद गुप्ता; जलसिंचन मंत्री संतोष कुमार सुमन; आमदार अरुण कुमार; आमदार राजकुमार सिंह; नीलम शर्मा; अशोक कुमार सिंह; ललितकुमार साही उर्फ गोपाळ बाबू; अजय कुमार; एन के सिंह; चंद्र भूषण प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा उद्धार करणे हे ध्येय्य आहे मोदी सरकार च्या गाठीशी म्हणूनच आम्ही आहोत ताकदीने त्यांच्या पाठीशी असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले .
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील शेती; शिक्षण ; आरोग्य सुविधा ; रस्ते आणि मूलभूत सर्व सुविधांचा आढावा घेण्यासाठी पी एम ओ कार्यालयाने ना. रामदास आठवले यांना बिहार मधील मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाठवले होते.
त्यानुसार ना.रामदास आठवले यांनी आज मुझफ्फरपूर चा दौरा केला यावेळी मुझाफरपुर मध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन केंद्र आणि राज्य सरकार च्या विविध योजनांच्या अंमलबजावणी चा आढावा ना. रामदास आठवले यांनी घेतला.सर्वांना शिक्षण चांगले आरोग्य ; रेशन अन्नधान्य; चांगले रस्ते ; पाणी; रोजगार मिळावा याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.दलित ओबीसींना केंद्र सरकार च्या सामजिक न्याय मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांचा ना. रामदास आठवले यांनी आढावा घेतला. सरकारी योजना चांगल्या राबवून सर्व गावांना ; ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत च्या सूचना ना.रामदास आठवले यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
0 टिप्पण्या