Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी विकास मंत्री मा.श्री. अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली कचारगड यात्रा नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न... ‌



भाविकांसाठी सोयी-सुविधा व सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्याचानिर्णय.                         
 मा.खा.अशोकजी नेते यांचीही बैठकीला उपस्थितीत                                  ‌                                     
चित्रा न्युज प्रतिनिधी
गोंदिया :-आदिवासी बांधवांचे आराध्य स्थान आणि आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुफा म्हणून ओळखले जाणारे कचारगड येथे दरवर्षीप्रमाणे कचारगड यात्रा यंदा ११ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात्रेच्या नियोजनासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना. अशोकजी उईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, खासदार डॉ. नामदेवराव किरसान,आमदार डॉ. परिणयजी फुके, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, आमदार संजयजी पुराम, आमदार राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी प्रणित नायर सर यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

*_भाविकांच्या सोयीसाठी व्यापक योजना_*
यात्रेदरम्यान देशभरातून लाखो भाविक येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यात रस्ते, वीज, स्वच्छ पाणी, रहदारीचे नियोजन, पार्किंगची सुविधा, सिसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता आणि कचरामुक्त परिसर यांचा समावेश आहे.

*बैठकीत मा.खा. अशोकजी नेते यांचे मत*
“कचारगड हे आदिवासी समाजाचे सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेत सहभागी होतात. भाविकांना दर्शनासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मा.खा. अशोकजी नेते यांनी बैठकीत सांगितले.
*सुरक्षेवर विशेष भर*
भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही हयगय होणार नाही, यासाठी आदिवासी विकास मंत्री मा.ना. अशोकजी उईके यांनी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. तसेच, स्थानिक प्रशासन, चेतना समिती आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाने यात्रेचे नियोजन यशस्वीपणे पार पाडण्याचा आग्रह त्यांनी धरण्यात आला.

कचारगड यात्रा – श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा
कचारगड यात्रा ही अनेक दशकांची परंपरा जपणारी आणि भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र असलेली यात्रा आहे. प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यंदाची यात्रा भाविकांसाठी अधिक सोयीस्कर आणि आनंददायी होणार आहे.

यात्रेच्या यशासाठी सर्वतोपरी सहकार्य..
 जि.प.अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, भाजपा संपर्क प्रमुख बाळाभाऊ अंजनकर,  कचारगढ चेतना समितीचे अध्यक्ष दुर्गादास कोकोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. येशुलाल उपराडे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, हनुमंत वट्टी आणि नाजुक कुमरे अन्य मान्यवरांनी यात्रेच्या यशस्वितेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भाविकांना सुखद आणि व्यवस्थित अनुभव मिळावा यासाठी प्रशासन सज्ज असून यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या