चित्रा न्युज ब्युरो
तळेगाव दशासर :-कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित 15 जानेवारी ला झालेल्या दो दाणी शंकर पट त्यानंतर 16 जानेवारी व 17 जानेवारी रोजी एकदानी पटाच्या आयोजन करण्यात आले हॊते.
त्यानंतर 18 जानेवारी शनिवार रोजी महिलांचा पट हा महिलासाठी मोठे आकर्षण असते.
आजच्या काळातील महिलांचा विचार केल्यास आपणाला खूपच आशादायी चित्र पाहायला मिळते महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. हे छान चित्र पाहायला मिळते ते तळेगाव येथील महिला पटामध्ये पटाचे सर्व संचालन महिलाच करतात. सूत्रसंचालना पासुन स्वयंसेवका पर्यंत चे सर्व भूमिका ह्या महिलाच पार पाडतात हे या महिला पटाचे विशेष आहें.
सुमारे 20 वर्षा पूर्वी कृषक सुधार मंडळाचे रावसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतुन हा पट सूरु करण्यात आला होता.
पुरुषाप्रमाणे महिलांनाही शंकर पटाचे प्राधान्य मिळावं या मागील उद्धेश होता आणी महिला सुद्धा या पटात मोठ्या प्रमाणावर या पटात सहभाग घेतात आता या महिला पटाने सुद्धा मोठे स्वरूप घेतले आज या पटाला पाहण्यासाठी दुरून मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात तसेव महिला पटात भाग घेण्यासाठी विविध ठिकाणाहूम महिला येतात.
आज दि.18 शनिवार रोजी जानेवारी रोजी महिला आरक्षित बैलजोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बैल जोडीचे पूजन करून महिला धुरकरिंना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
व रितसर पटाला सुरवात करण्यात आली. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी सुद्धा तुफान व वेगवान जोड्या हाकल्या. त्याच बरोबर नोंदनी स्वयंसेवक व सूत्रसंचालन अशा विविध भूमिका महिलांनी पार पाडल्या.
या पटामध्ये लक्ष्मी सोनबावणे मीरजापूर 11.96 सेकंद वेळात अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकाविला तर तळेगाव च्या महिला धुरकरी सोनू शंकर राऊत 12.02 सेकंद वेळ घेत द्वितीय स्थान प्राप्त केले.साक्षी ठाकरे रा, मीरजापूर या महिला धुरकरी ने 12.14 सेकंद वेळ घेत या जोडीने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले. व इतर बक्षिसाचे वितरण करण्यात आले. तसेच या महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेत अंकिता कावळे, नीलिमा देशमुख इत्यादी महिला धुरकर्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या महिला आरक्षित बैल जोडी स्पर्धेचे उदघाटन पुष्पाताई अशोकराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती अर्चनाताई रोठे ,सरपंच मीनाक्षी ताई ठाकरे,शुभांगीताई शिवाजीराव देशमुख, सीमाताई कुळकर्णी, संध्याताई डेहणकर, भारती चुटे, गवळी ताई, भाले बाई, लता वाघे तसेच महिला ग्रामपंचायत सदस्या व मोठया संख्येने महिला प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.
0 टिप्पण्या